Solapur Highway: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! या राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार होणार; ३५३ कोटींचा निधी मंजूर

Solapur Highway Bhurikavathe to Tolnur Road Widening: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र कर्नाटक राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार आहे. यासाठी ३५३ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
Solapur Highway
Solapur HighwaySaam Tv
Published On
Summary

सोलापूकरकरांसाठी आनंदाची बातमी

राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाला मंजुरी

३५३ कोटी रुपयांचा निधी मंजुरी

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळाली आहे. सोलापूरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या महाराष्ट्र कर्नाटक राज्य सीमा सेक्शनच्या रस्त्याच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळाली आहे.

Solapur Highway
Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा| VIDEO

सोलापूर महामार्गातील भुरीकवठे-वागदरी-अक्कलकोट-तोळणूर ते कर्नाटक राज्यसीमा सेक्शनच्या ४७ किमीच्या रुंदीकरणासाठी ३५३ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या रुंदीकरणासाठी प्रस्ताव चार महिन्यांपूर्वीच सादर केला होता.

महामार्ग रुंदीकरणानंतर आताचा ७ मीटरचा रस्ता हा १२ मीटरचा होणार आहे. सांगवीला नवीन पूल बांधण्यात येणार आहे. वागदरी परिसरातून बाह्यवळण मार्ग होणार आहे.

Solapur Highway
Pune Solapur Highway : अक्कलकोटला जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात ५ जणांचा जागेवरच मृत्यू

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना जोडणारा महामार्ग महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरुन जड वाहतूक होते. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याची अवस्था फार वाईट होते. रस्ता अरुंद असल्याने खूप अडचणी येतात. यामुळे रुंदीकरणासाठी प्रस्ताव ठेवला होता.आता यासाठी मंजुरी मिळाली आहे.

महाराष्ट्र कर्नाटक राज्यसीमा रस्त्यावरील ४७ किमी महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

महामार्ग रुंदीकरणासाठी ३५३.२३ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही राज्यातील वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे. या मार्गामुळे लातूर, उमरगा आणि आंध्र प्रदेशमधील भाविकांना अक्कलकोट येथे येण्यास मदत होणार आहे. प्रवास जलद आणि अधिक सुखकर होणार आहे.

Solapur Highway
Akkalkot-Karnatak Highway: स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! राष्ट्रीय महामार्गासाठी ५५३ कोटींचा निधी मंजूर

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधूनही लाखो भाविक अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येतात. स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा आहे. याचसोबत आता या महामार्गावरुन सध्याच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करु शकणार आहेत.

Solapur Highway
Solapur Tourism : मराठ्यांच्या इतिहासाशी जोडलेला सोलापूरमधील महत्त्वाचा किल्ला, 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com