Solapur Tourism : मराठ्यांच्या इतिहासाशी जोडलेला सोलापूरमधील महत्त्वाचा किल्ला, 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

Shreya Maskar

सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हा ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. मंगळवेढा हे ऐतिहासिक आणि पवित्र तीर्थक्षेत्र असून, ते 'संतांची भूमी' म्हणून प्रसिद्ध आहे.

Fort | google

कोणाची सत्ता?

मंगळवेढा १४ व्या शतकात प्रामुख्याने बहामनी सत्तेच्या अधिपत्याखाली आला, त्यानंतर आदिलशाहीचा (विजापूर) भाग बनला. १४९८ ते १६५९ या काळात हा प्रदेश आदिलशहाच्या नियंत्रणात होता.

Fort | google

मंगळवेढा

मंगळवेढा भुईकोट किल्ला समुद्रसपाटीपासून साधारणपणे ४५९ मीटर ते ४८५ मीटर उंचीवर स्थित आहे.मंगळवेढाला पूर्वी ७ बुरुज असल्याचे मानले जाते.

fort | google

इतिहास

मंगळवेढा येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५८ वर्षांपूर्वी दक्षिणेतील मोहिमेवर असताना येथे सात दिवस मुक्काम केला होता. सध्या या ऐतिहासिक किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.

fort | google

किल्ल्याच्या आत किल्ला

मंगळवेढा किल्ल्याच्या आत 'चौबुर्जी' नावाचा एक लहान, चौरस आकाराचा अंतर्गत किल्ला आहे. या मजबूत तटबंदीच्या चौबुर्जीला चार बुरूज (रणमंडळ, राहत, बाऊत आणि बढेखान) असून तो २३० फूट लांबीचा आहे.

fort | google

सोलापूर धार्मिक स्थळे

सोलापूर जिल्हा ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ केंद्र, सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर आहे. येथे कुटुंबासोबत नक्की जा.

fort | google

सोलापूर पिकनिक स्पॉट

सोलापूर येथे उजनी धरण, माळढोक पक्षी अभयारण्य हे पिकनिक स्पॉट आहे. येथे तुम्ही सुंदर फोटोशूट करू शकता. तसेच निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू शकता.

family trip | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

family trip | yandex

NEXT : इतिहास अन् निसर्गाचा सुंदर संगम, कोल्हापूरमधील 'हे' ठिकाण वन डे ट्रिपसाठी बेस्ट

Kolhapur Tourism | google
येथे क्लिक करा...