Kolhapur Tourism : इतिहास अन् निसर्गाचा सुंदर संगम, कोल्हापूरमधील 'हे' ठिकाण वन डे ट्रिपसाठी बेस्ट

Shreya Maskar

पन्हाळा

पन्हाळा हे कोल्हापूर जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून सुमारे ३१७७ ते ३२०० फूट उंचीवर वसलेले एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य हिल स्टेशन आहे.

Hill Station | google

कोल्हापूर

कोल्हापूरपासून सुमारे १८-२१ किमी अंतरावर असलेला पन्हाळा किल्ला आपल्या मजबूत तटबंदीसाठी, मध्ययुगीन वास्तुकलेसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.

Hill Station | google

इतर नावे

पन्हाळा किल्ल्याला पन्हाळगड, पर्णालदुर्ग असेही म्हणतात. पन्हाळा सह्याद्रीच्या कुशीत असून, येथील गारवा, घनदाट झाडी पर्यटकांना भुरळ घालते.

Hill Station | google

सह्याद्री

कोल्हापूरजवळील पन्हाळा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने आणि अनेक ऐतिहासिक घटनांनी पावन झालेला एक महत्त्वपूर्ण डोंगरी किल्ला आहे.

Hill Station | google

कालखंड

पन्हाळगड हा शिलाहार राजा भोज (दुसरा) याने १२ व्या शतकात बांधला, जो पुढे यादवांच्या, बहामनी, आदिलशाही आणि अखेर मराठा साम्राज्याचा भाग बनला.

Hill Station | google

कसं जाल?

कोल्हापूरला गेल्यावर तुम्ही रिक्षाने किंवा बसने पन्हाळा येथे जाऊ शकता. येथे आजूबाजूला रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि होमस्टे उपलब्ध आहेत. जेथे राहण्याची, खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.

Hill Station | google

कधी भेट द्याल?

पन्हाळ्याला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भेट द्या. हिवाळ्यात येथे धुके आणि हिरवळ पाहायला मिळते. तसेच तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.

Hill Station | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Hill Station | google

NEXT : मुंबईजवळील 8 ऐतिहासिक किल्ले, एकदा तरी नक्की भेट द्या

Mumbai Tourism | google
येथे क्लिक करा...