Shreya Maskar
वसईचा किल्ला हा जलदुर्ग असून पोर्तुगीजकालीन आहे. वसई किल्ल्यात मराठा-पोर्तुगीज युद्धाचा इतिहास दडलेला आहे.
अर्नाळा किल्ला विरार जवळील प्रसिद्ध किल्ला आहे. अर्नाळा किल्ल्याच्या जवळच अर्नाळा बीच देखील आहे. त्यामुळे येथे बोटींग, घोडेसफारीचा आनंद घेता येतो.
वांद्रे किल्ला हा वांद्रे-वरळी सी लिंकजवळ आहे. पोर्तुगीजांनी बांधलेल्या या किल्ल्यावरून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. त्यामुळे पर्यटक येथे वीकेंडला गर्दी करतात.
वरळी किल्ला मुंबईतील दक्षिण भागात, वरळी कोळीवाडा येथे अरबी समुद्राच्या काठावर स्थित आहे. हा १६७५ च्या सुमारास ब्रिटिशांनी बांधलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.
शिवडी किल्ला शिवडी येथे ब्रिटिशकालीन ऐतिहासिक ठिकाण आहे. शिवडी किल्ल्याच्या जवळ दलदलीत फ्लेमिंगो पक्षी पाहता येतात. लहान मुलांसोबत येथे नक्की फिरायला जा.
कर्नाळा किल्ला पनवेल जवळील कर्नाळा पक्षी अभयारण्यात आहे. कर्नाळा हा डोंगराळ किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम आहे. तुम्ही या किल्ल्याला मित्रांसोबत फिरायला जा.
माहीमची खाडी आणि वरळीच्या किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी माहीमचा किल्ला बांधण्यात आला. याला मोठे ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.