Shreya Maskar
सातारा हिल्स हे महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील सात टेकड्यांनी वेढलेले, कृष्णा-वेण्णा नद्यांच्या काठावर वसलेले एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक ठिकाण आहे.
सातारा हिल्स जरंडेश्वर, यवतेश्वर, अजिंक्यतारा, किटलीचा डोंगर, सज्जनगड, पेध्याचा भैरोबा आणि नाकडीचा डोंगर या सात टेकड्यांनी वेढलेले आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे नक्की जा. हिरवीगार वनराई, धुक्याने भरलेले डोंगर आणि अनेक लहान-मोठे धबधबे येथे पाहायला मिळतात.
थंडीत फिरायला आणि जोडीदासोबत हनिमूनसाठी हे लोकेशन एकदम खास आहे. येथील वातावरण तुमचे नाते फुलवते आणि तुमचे प्रेम वाढते.
साताऱ्यात गेल्यावर महाबळेश्वर, कास पठार, ठोसेघर धबधबा, वासोटा किल्ला, अजिंक्यतारा किल्ला आणि यवतेश्वर घाट ही मुख्य पर्यटन स्थळ आहेत.
साताऱ्याला गेल्यावर तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. वासोटा, प्रतापगड, अजिंक्यतारा आणि कमळगड ही ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाणे आहेत.
ठोसेघर धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा प्रामुख्याने पावसाळ्यात फुलून वाहतो आणि कोकणच्या कडेला वसलेला आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.