Shreya Maskar
रायसेन किल्ला हा मध्य प्रदेशातील भोपाळपासून सुमारे 45 किमी अंतरावर विंध्याचल पर्वतरांगेत टेकडीवर वसलेला ८०० वर्षांहून अधिक प्राचीन किल्ला आहे.
रायसेन किल्ला 11 व्या शतकात किल्ला बांधला आहे. १५४३ मध्ये शेरशाह सुरीने रायसेनचा किल्ला चंदेरीचा राजपूत राजा पूरणमल याच्याकडून जिंकला.
रायसेन किल्ला त्यांच्या अभेद्य तटबंदी, ऐतिहासिक बादल महाल, रोहित महाल आणि अनेक प्राचीन जलसाठ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
१५०० फूट उंच टेकडीवर वसलेल्या रायसेन किल्ल्यात चार मुख्य महाल, ९ बुरूज आणि ४० हून अधिक विहिरी आहेत, जी प्राचीन जलव्यवस्थापन प्रणाली दर्शवते.
रायसेन किल्ल्याच्या आत एक प्राचीन आणि रहस्यमयी सोमेश्वर महादेव मंदिर आहे. जे वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीला उघडले जाते.
रायसेन किल्ल्यावर हजरत पीर फतेहुल्ला शाह बाबांचा प्रसिद्ध दर्गा आहे. हा दर्गा शतकानुशतके धार्मिक सलोख्याचे प्रतीक मानला जातो.
रायसेन किल्ल्यावर ट्रेकिंग करता येते. येथे डोंगराळ रस्ता आणि जंगलातून जाणारा मार्ग पाहायला मिळतो. येथे सुट्टीत आवर्जून एकदा भेट द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.