

मुंबईच्या लोकलमधून दररोज लाखो लोकं प्रवास करतात. ट्रेनमध्ये प्रवाशांव्यतिरीक्त अनेक विक्रेतेही प्रवास तरतात. सध्या असाच लोकल ट्रेनमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ५८ वर्षीय रेणू शर्मा यांचा तो व्हिडीओ असून त्या लोकल ट्रेनमध्ये गाताना दिसतायत. मुख्य म्हणजे रणू या कॅन्सरमधून बऱ्या झाल्या असून आता त्या कॅन्सरग्रस्तांना त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून मदत करतात.
५८ वर्षांच्या रेणू शर्मा यांन स्वतः कॅन्सरशी झुंज दिली आणि त्या बऱ्या झाल्यात. पण स्वतःच्या वेदनेत अडकून न राहता त्यांनी इतरांसाठी चांगलं काम करण्याचा निर्णय घेतलाय. लोकल ट्रेनमध्ये गाणं म्हणून मिळालेल्या पैशांद्वारे त्या कॅन्सरग्रस्तांना मदत करतात. त्यांच्या आवाजातून उमटणारा भाव आणि जिद्द प्रवाशांच्या मनाला थेट स्पर्श करतात.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रेणू शर्मा मुंबई लोकलच्या डब्यात प्रवास करताना गाणं म्हणताना दिसतात. सामान्यपणे त्यांचा हा प्रवास सफाळे ते मुंबई सेंट्रल असा असतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. गर्दीने भरलेल्या डब्यात त्या शांतपणे गाण्याला सुरूवात करतात आणि काही क्षणांतच आसपासचे प्रवासी त्यांच्याकडे लक्ष देऊ लागतात. काही जण मोबाईलमध्ये हा क्षण टिपतात, तर काही जण भावूक होऊन टाळ्याही वाजवतात.
रेणू शर्मा यांना वयाच्या ४७ व्या वर्षी प्रथम कॅन्सरचे निदान झालं होतं. त्या काळात त्यांनी उपचार आणि मानसिक संघर्ष सहन केल्याचं त्यांनी एका वेबसाईटला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय. मात्र या सगळ्या वेदनेतून त्यांनी हार मानली नाही. उलट त्या कॅन्सरग्रस्त लहान मुलांच्या मदतीसाठी पुढे आल्या. त्यांनी एक NGO सुरू केलं असून गाणी गाऊन त्या ठिकाणी निधी जमा करण्याचं काम त्या करतात.
रेणू म्हणतात की, “मी कॅन्सरवर मात केली पण त्या प्रवासाने मला बदलून टाकलं. आता माझं गाणं माझ्यासाठी नाही तर त्या मुलांसाठी आहे जे या आजाराशी अजूनही लढत आहेत.” त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होताच त्यांना 'रिअल हिरो' म्हटलंय. काहींनी मदतीची तयारी दर्शवली, तर काहींनी त्यांच्या NGO बद्दल माहिती विचारलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.