विश्वभूषण लिमये, सोलापूर प्रतिनिधी
Solapur local news today : सोलापूरमध्ये पहाटे झालेल्या भीषण अपगातात कॉलेजमधील ३ मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर सोलापूर शहरावर शोककळा पसरली. पहाटेच्या वेळी एका अज्ञात वाहनाने ३ जणांना चिरडल्याची (Solapur early morning accident news update) घटना घडली आहे. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघातात मृत्यू झालेल्या तिघांचे वय अंदाजे १८ ते २० वर्ष असू शकते असे स्थानिकांनी सांगितले. (hit and run case investigation in Solapur)
सोलापूर शहरातील रूपाभवानी मंदिर परिसरात पहाटे हा भयंकर अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने ३ मित्रांना चिरडले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. नागेश गवंडी, रोहन पोरे आणि बसवराज चनशेट्टी असे मृत तरुणांची नावे आहेत. अपघातानंतर घटनास्थळावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. स्थानिकांनी त्या तिघांना अपघातानंतर रूग्णलायात दाखल केले, पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या भयंकर अपघातानंतर सोलापूरमधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी रूपाभवानी मंदिर परिसरात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघात नेमका कसा झाला? याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळावर अथवा बाजूला असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली आहे. अपघातानंतर चालकाने पळ का काढला? ३ मित्र पहाटेच्या वेळी घराबाहेर का पडले होते? यामागील कारणाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
पहाटे झालेल्या भीषण अपघातात ३ मित्रांचा दुर्दैवी अंत झाला. त्यामुळे सोलापूर शहरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. गवंडी, पोरे आणि चनशेट्टी कुटुंबाचा आक्रोश झालाय. पोरं कॉलेजमध्ये होती, शिकण्याची मोठी जिद्द होती. स्वप्न उराशी होतं.. पण नियतीने घात केला.. अशा प्रतिक्रिया सोलापूरकरांच्या येत आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घ्यावा, अशी मागणी मृत झालेल्या तरूणाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.