Accident Video : ऑफिसला जाताना कंटेनर 'यम' बनून आला, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा चेंदामेंदा, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

CCTV accident viral video : चित्तूर-बेंगळुरू महामार्गावर धावत्या कारवर कंटेनर कोसळून २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला. भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
CCTV accident viral video
CCTV accident viral videoSaam
Published On

software engineer killed in truck container crash : कर्नाटकातील चित्तूर-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात झालाय. धावता कंटेनर महामार्गावर एका कारवर कोसळला. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जागीच भयंकर मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि अपघाताचा तपास सुरू आहे.

शुक्रवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघातात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर अनुदीपचा मृत्यू झाला. अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आलाय. वेगात असणारा ट्रक कंटेनर अचानक उजवीकडे झुकला आणि अनुदीपच्या कारवर कोसळला. त्यामुळे कार पूर्णपणे चिरडली गेली. अपघात इतका भीषण होता की अनुदीपचा जागीच मृत्यू झाला. अनुदीप हा चित्तूरजवळील गुडीपाला मंडळातील रामापुरम गावचा रहिवासी होता.

CCTV accident viral video
Gram Panchayat Bandh : मोठी बातमी! राज्यातील सर्वच ग्रामपंचायती शुक्रवारी बंद, नेमकं कारण काय?

अनुदीप हा बंगळुरूमधील एका आयटी कंपनीत कामाला आहे. तो शुक्रवारी कामासाठी घराबाहेर पडला. कारमधून तो आयटी कंपनीत कामावर जात होता. पण काही क्षणातच काळाने घाला घातला. व्हिडिओमध्ये ट्रक कंटेनर अचानक त्याच्या कारवर कोसळल्याचे दिसतेय. ट्रक कंटेनरचा तोल जात असल्याचे पाहून अनुदीपने कार एकाच जागेवर रोखली होती. पण नियतीने घात केला. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की अपघातापूर्वी ट्रकचा तोल गेला होता. त्यात कारचा चेंदामेंदा झाला. या भयंकर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून तपास करण्यात येत आहे.

CCTV accident viral video
Crime : धक्कादायक! चाकूने छाती व पोटावर वार, भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

पोलिसांनी या अपघात का आणि कसा झाला? याचा तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कंटेरनचा वेग अतिशय होता असे दिसून आले. त्याशिवाय कंटेरन वेगात असल्याने एका बाजूला झुकल्याचे व्हिडिओत दिसतेय. यांत्रिक बिघाड किंवा चालकाचा निष्काळजीपणा होता का? याचा पोलिस अधिक तपास करत आहेत. अपघातानंतर महामार्ग बराच काळ बंद होता. पोलिसांनी मातीकाम करणाऱ्या यंत्रांच्या साहाय्याने कंटेनर बाजूला केला आणि वाहतूक पूर्ववत केली.

CCTV accident viral video
VIDEO: सूर्यानं दिग्गज बॉलरला झापलं, हार्दिकही संतापला, पाकिस्तानला हरवल्यानंतर नेमकं काय झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com