Crime : धक्कादायक! चाकूने छाती व पोटावर वार, भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

BJP corporator husband attacked in Nagpur : नागपूरमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक चाकू हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी नितीन शिमले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून हल्ल्यामागील कारणांचा तपास सुरू आहे.
BJP corporator husband attacked in Nagpur
BJP corporator husband attacked in NagpurSaam TV Marathi News
Published On

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur Latest Crime News : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शिमले यांच्या पतीवर शुक्रवारी प्राणघातक हल्ला झाला. मानसी यांचे पती नितीन शिमले यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र हल्ला केला. नितीन शिमले हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. निवडणूक झाल्यानंतर त्यांच्यावर हल्ला कुणी आणि का केला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झालेला असू शकतो, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Nitin Shimle stabbing incident details)

शुक्रवारी झालेल्या या हल्ल्यात नितीन शिमले गंभीर जखमी झाले आहेत. शिमले यांच्यावर नागपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. शिमले यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत पंचनामा केला. हल्ला कुणी आणि का केला? याचा तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी शिमले यांचा जबाब घेतला घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

BJP corporator husband attacked in Nagpur
VIDEO: सूर्यानं दिग्गज बॉलरला झापलं, हार्दिकही संतापला, पाकिस्तानला हरवल्यानंतर नेमकं काय झालं?

भाजप नगरसेविका मानसी शिमले यांच्या पती निखिल श्याम शिमले आहेत. शिमले व ठाकरे हे जुने मित्र असून पूर्वी एका हत्याकांडात आरोपी होते. पण त्यांची निर्दोष सुटका झाली होती. शुक्रवारी तलाव परिसरात शिमले यांच्यावर हल्ला झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे आणि शिमले यांच्यामध्येच हाणामारी झालेली असू शकते. आरोपी महेश ऊर्फ सोनू गणेश ठाकरे याने चाकूने छाती व पोटावर वार केल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमी शिमले यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. नागपर पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

BJP corporator husband attacked in Nagpur
IND vs PAk : भारताकडून सारखं का हरताय? पराभवानंतर पाकिस्तानचा फॅन स्टेडिममध्येच ढसाढसा रडला, व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com