Singer Accident: मुंबईतील शोआधी प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल, आता कशी आहे प्रकृती?

Singer Accident: प्रसिद्ध गायक मनजीत सिंग राल याचा लंडनमध्ये एका भीषण अपघातात झाला आहे. या दुर्दैवी अपघातापूर्वी मनजीत मुंबईत एका मेगा अवॉर्ड शोमध्ये सादरीकरण करणार होते.
Singer Accident
Singer AccidentSaam Tv
Published On

Singer Accident: प्रसिद्ध गायक मनजीत सिंग राल, ज्याला चाहते मंज म्युझिक म्हणून ओळखतात त्याचा लंडनमध्ये अपघात झाला आहे. या अपघातानंतर, गायकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मनजीत सिंग राल मुंबईतील एका मेगा अवॉर्ड शोमध्ये परफॉर्मन्स करणार होता, परंतु अपघातामुळे त्याला त्याचा भारत दौरा रद्द करावा लागणार आहे. मनजीत हा ब्रिटिश-भारतीय आयकॉन आणि प्रसिद्ध बँड आरडीबीचा लिड सिंगर होता. तो उद्या मुंबईत होणाऱ्या झी सिने अवॉर्ड्स २०२६ मध्ये एक दमदार परफॉर्मन्स करणार होता.

भारत दौरा रद्द

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अपघातानंतर मनजीतला लंडनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात्या प्रकृतीची अद्याप माहिती मिळाली नाही. यामुळे त्याचा मुंबई दौरा रद्द करण्यात आला आहे. "स्वॅग मेरा देसी" आणि "लाल घागरा" सारख्या हिट गाण्यांसाठी ओळखला जाणारा मनजीत झी सिने अवॉर्ड्स २०२६ मध्ये त्याच्या भांगडा आणि हिप-हॉपमुळे सादर करणार होता.

Singer Accident
Prajakta Mali: 'बाय बाय फोन...'; प्राजक्ता माळीचा 15 दिवस मोबईल बंद, नेमकं घडलंय काय?

आरडीबीचा लिड सिंगर

ब्रॅडफोर्डमध्ये जन्मलेले मनजीत सिंग रालने त्याचा भाऊ कुली (कुलदीप राल) आणि सुरजित सिंग यांच्यासोबत आरडीबी ची सुरुवात केली. त्यांनी २००० च्या सुरुवातीला आरडीबीची स्थापना केली. सुरुवातीला, त्यांनी गुरुद्वारांमध्ये सादरीकरण केले. आरडीबीची स्थापना केल्यानंतर, त्यांनी बॉलीवूड आणि आंतरराष्ट्रीय संगीताचे मिश्रण करून एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या संगीताद्वारे, त्यांनी ब्रिटनच्या रस्त्यांवर बॉलिवूडची छाप सोडली.

Singer Accident
Famous Singer Death: जगप्रसिद्ध गायकाचे अचानक निधन; संगीतविश्वाला मोठा धक्का

मोठा भाऊ कुलीचे निधन

स्थानिक गुरुद्वारांमध्ये गाण्यापासून ते स्नूप डॉग, टी-पेन आणि लुडाक्रिस सारख्या प्रसिद्ध जागतिक स्टार्ससोबत काम करण्यापर्यंत, आरडीबीने आपली ओळख निर्माण केली. पण, २०१२ मध्ये त्याचा मोठा भाऊ कुलजीत सिंग राल, ज्याला कुली राल म्हणूनही ओळखले जायचे, त्याचे निधन झाले. या नुकसानानंतर, मांजने २०१४ मध्ये स्वतःचे लेबल, म्युझिक वन ग्लोबल लाँच केले आणि 'व्हिसल बाजा' आणि 'लाल घागरा' सारखे बॉलिवूड हिट गाणे दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com