Prajakta Mali: मराठी मनोरंजन जगतातील लोकप्रिय आणि चाहत्यांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडियावरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने पुढील १५ दिवस 'फोन बंद' ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ती पुढचे १५ दिवस सोशल मीडियावर आणि चाहत्यांशी संवाद साधण्यास उपलब्ध राहणार नाहीत.
प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये 'बाय बाय फोन फॉर नेक्स्ट १५ डे असा संदेश देत या काळात मोबाईल वापरणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहते काही काळी चिंतेतही पडले होते. पण नंतर तीची दुसरी स्टोरी बघून चाहत्यांनी ती मोबाईल का बंद ठेवणार आहे ते कळले.
पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोमुळे समजले की प्राजक्ता सध्या बंगळूरूमधील आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमात आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग हा एक आध्यात्मिक आणि मानसिक शांततेसाठी प्रसिद्ध जागतिक उपक्रम आहे, ज्याचे अध्यक्ष श्री श्री रविशंकर आहेत आणि येथे योग, ध्यान, श्वसनक्रिया व मानसिक स्थिरतेसाठी विविध कोर्स घेतले जातात.
बंगळूरूमधील या आश्रमात प्राजक्ता पुढील १५ दिवस ध्यान, साधना आणि आत्मचिंतन करण्यासाठी वेळ घालवणार आहेत. आश्रमातील प्रसिद्ध विशालाक्षी मंडप आणि निसर्गरम्य परिसरात मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि चिंता कमी करण्यासाठी अनेक सत्रे घेतली जातात.
प्राजक्ता माळी हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक अत्यंत लोकप्रिय नाव आहे. अभिनेत्री, नृत्यांगना, कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही ती ओळखली जाते. चाहत्यांमध्ये ती तिच्या कला, स्टाईल आणि व्यक्तिमत्वासाठी खूप प्रिय आहे. त्यामुळे तिचा हा निर्णय चाहत्यांसाठी आश्चर्यकारक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.