Bigg Boss Marathi 6: राकेशने केलं तन्वीला किस; राखीचं दुखावलं मन रडत-रडत स्वत:ला दिली 'ही' शिक्षा

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात रोज काही ना काही विचित्र पण मनोरंजन गोष्टी घडत असतात. राकेश बापटवर एकतर्फी प्रेम करणारी राखी सावंत आता खूप जास्त दुखावलेली दिसत आहेत.
Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6Saam Tv
Published On

Bigg Boss Marathi 6:बिग बॉस मराठी ६’च्या घरात रोज नवीन ट्विस्ट आणि वाद पाहायला मिळत आहेत. कधी सदस्यांमधील मैत्री तर कधी प्रेम, तर कधी कटकारस्थानामुळे घरातील वातावरण ढवळून निघत आहे. विशाल आणि रुचिता यांची केमिस्ट्री कधी जुळताना तर कधी दुरावताना दिसत आहे. दुसरीकडे अनुश्रीच्या कारस्थानांची चर्चा रंगत असतानाच आता घरात आणखी एक भावनिक प्रसंग घडला आहे.

अभिनेता राकेश बापटवर एकतर्फी प्रेम व्यक्त करणारी राखी सावंत सध्या खूपच दुखावलेली दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कदरम्यान राकेशने डान्स करताना तन्वी कोलतेच्या गालावर किस केले. हा प्रसंग पाहून राखीचा संताप आणि दु:ख अनावर झाले. तिने रडत-रडत स्वतःलाच शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.

Bigg Boss Marathi 6
Rashmika Vijay Wedding: रश्मिका मंदान्नाने विजय देवरकोंडासाठी केली इमोशनल पोस्ट; म्हणाली, 'इंट्रोड्यूस करते माझा नवरा...'

राखीने घरातील सदस्यांसमोरच स्वतःचे केस कापण्यास सुरुवात केली. “मला कोणी दुखावू शकत नाही, फक्त मीच स्वतःला दुखावू शकते,” असे म्हणत ती भावूक झाली. तिच्या या कृतीमुळे घरातील इतर सदस्यही हादरले. अनेकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. राकेश बापटनेही तिला असे करू नकोस, असे सांगत शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र राखीने शेवटी केस कापलेच.

Bigg Boss Marathi 6
Dipika Kakar: सर्जरीनंतर हॉस्पिटलमधून घरी आली दीपिका कक्कर; चाहत्यांचे मानले आभार, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

हा सगळा प्रसंग ‘कलर्स मराठी’ने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रोमोच्या स्वरूपात शेअर केला आहे. प्रोमो पोस्ट होताच चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. बिग बॉसचे चाहते या प्रोमोवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एकाने लिहिले, राखीने टकला केला आसता तर खुप चांगले झाले आसते ते नकली केस कापुन काही उपयोग नाही. तर आणखी एकाने लिहीले, राखीला प्रतेक शो मध्ये एक नवीन प्रेम होत मग नवीन ड्रामा होतो. तर दुसऱ्याने कमेंट केली, काय वेडेपणा आहे राखी? किती तर नाटकं? अगं प्रत्येक सीझनला तु कुणाच्या तरी प्रेमात पडतेस. किती लग्न केलेस. तरी तुला नाही समजत का.... की असं प्रेम दुसऱ्यांवर जबरदस्तीनी थोपवता येत नाही. राकेश ला तु आवडत नाहीस आणि तन्वी बरोबर तो फक्त ऍक्ट करत होता अगं तो तिला बहीण मानतो गं बाई.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com