Famous Singer Death: जगप्रसिद्ध गायकाचे अचानक निधन; संगीतविश्वाला मोठा धक्का

Famous Singer Death: प्रसिद्ध गायक आणि गीतकार नील सेडाकाचे निधन झाले आहे. यांनी ८० वर्षांचे होईपर्यंत दरवर्षी प्रेक्षकांसाठी अनेक कॉन्सर्ट केले. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात पोकळी निर्माण झाली आहे.
Singer Lyricist Neil Sedaka passes away
Singer Lyricist Neil Sedaka passes awaySaam Tv
Published On

Famous Singer Death: प्रसिद्ध गायक आणि गीतकार नील सेडाका यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षाी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या उत्तम गाण्यांनी त्यांना रॉक अँड रोलच्या सुरुवातीच्या काळात मोठी प्रसिद्धी मिळवली. १९७० च्या दशकात ते घराघरात लोकप्रिय झाले. त्यांच्या हिट गाण्यांमध्ये 'ब्रेकिंग अप इज हार्ड टू डू' आणि 'लाफ्टर इन द रेन' यांचा समावेश होता.

कुटुंबाने निधनाची माहिती दिली

नील सेडाकाच्या कुटुंबाने सोशल मीडियावरील एका निवेदन प्रसिद्ध करुन त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, 'आमचे प्रिय पती, वडील आणि आजोबा नील सेडाका यांच्या अचानक निधनाने आमचे कुटुंब खूप दुःखी आहे. एक खरा रॉक अँड रोल दिग्गज, लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आणि एक उत्तम माणूस, त्यांची खूप आठवण येईल."नील सेडाका यांचे निधन कसे झाले याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.

Singer Lyricist Neil Sedaka passes away
Prajakta Mali: 'बाय बाय फोन...'; प्राजक्ता माळीचा 15 दिवस मोबईल बंद, नेमकं घडलंय काय?

प्रसिद्ध गाणी

ब्रिल बिल्डिंग सॉन्गरायटिंग फॅक्टरी, सेडाकाचे मेंबर्स, गीतकार हॉवर्ड ग्रीनफिल्ड यांच्यासह, नील सेडाका यांनी १९५० च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते १९६० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत खूप लोकप्रिय अशी गाणी तयार केली. त्यांच्या गाण्यांमध्ये 'हॅपी बर्थडे स्वीट सिक्सटीन', 'कॅलेंडर गर्ल' आणि 'ओह! कॅरोल' यांचा समावेश आहे.

Singer Lyricist Neil Sedaka passes away
Bigg Boss Marathi 6: राकेशने केलं तन्वीला किस; राखीचं दुखावलं मन रडत-रडत स्वत:ला दिली 'ही' शिक्षा

वयाच्या ८० व्या वर्षी कॉन्सर्ट

८० वयाचे असतानाही, नील सेडाका यांनी वर्षाला अनेक कॉन्सर्ट केले. त्यांनी कायम तरुणपिढीला प्रोत्साहन आणि नविन काही तरी करत राहण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांचे भारतासह जगभरात लाखो चाहते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com