Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये शिख बांधवांनी केला होळीचा सण साजरा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक ४ मार्च २०२६, इराण-इस्त्राइल युद्ध, पाकिस्तान-अफगाणिस्तान हल्ला, महाराष्ट्रात अर्थसंकल्प अधिवेशन, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update:
Maharashtra Live News Update:Saam
Published On

नांदेडमध्ये शिख बांधवांनी केला होळीचा सण साजरा

नांदेडमध्ये शिख बांधवांनी होळीचा सण साजरा केला.

Solapur : वाढत्या कॅन्सर रुग्णसंख्येकडे आमदार कोठेंनी वेधलं लक्ष

सोलापूरातील वाढत्या कॅन्सर रुग्णसंख्येकडे आमदार देवेंद्र कोठे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. उजनीतील दूषित पाण्यामुळे सोलापुरात कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी : दीर्घकालीन उपाययोजनेची मागणी केली.

Beed : जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधव आत्महत्या प्रकरणात प्रदीप फाटे याला तीन दिवसाची पोलीस कोठडी

बीड येथील जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधवर यांनी 17 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. त्या प्रकरणात तब्बल 40 दिवसानंतर जीएसटी विभागातीलच वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याला पुणे येथून अटक करण्यात आली. त्याला आज बीड येथील न्यायालया समोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शॉर्ट सर्किटमुळं सॉ मिल जळून खाक...भंडाऱ्याच्या पोहरा येथील घटना...

शॉर्टसर्किटमुळं अचानक आगीची ठिणगी उडाली आणि बघताबघता रौद्ररूप धारण केलेल्या आगीत सॉ मिल पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना भंडाऱ्याच्या लाखनी - पालांदूर मार्गावरील पोहरा इथं घडली. या आगीत सॉ मिल पूर्णपणे जळून खाक झाल्यानं दिगंबर अंबादे यांचं यात लाखो रुपयांचं नुकसान झालं. सॉ मिल लगत पोहरा गावातील नागरी वस्ती असून आगीची माहिती मिळताचं ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यानंतर लाखनी इथून आलेल्या अग्निशमन पथकानं आगीवर नियंत्रण मिळविल्यानं मोठी दुर्घटना टळली.

कल्याणमध्ये अंगावर अंडे फेकल्याचा जाब विचारताच तरुणाला बेदम मारहाण; CCTV मध्ये कैद

आडवली परिसरातील राजाराम नगर, ओमकारेश्वर अपार्टमेंटसमोर घटना

अंडे फेकणाऱ्या दोघांकडून शिवीगाळ करत मारहाण

संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद; परिसरात खळबळ

मानपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल; पोलीस तपास सुरू

नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटर अखेर नाशिक मनपाकडून सील

- तर स्त्री बीज तस्करी प्रकरणात डॉ. अमोल पाटीलला बदलापूर पोलिसांनी काल केलीय अटक

- बदलापूरमध्ये स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिक कनेक्शन आलं होतं समोर

- नाशिकच्या परवानगीवर बदलापूरमध्ये फर्टिलिटी सेंटर सुरू असल्याची होती तक्रार

- तर तपासात डॉ. अमोल पाटील आणि डॉ. वंदना पाटील यांच्या नावावर नाशिकला परवानगी

- संपूर्ण देशभर स्त्री बीज तस्करीसाठी डॉ. अमोल पाटील एजंट म्हणून कार्यरत असल्याचा संशय

एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी राहुल शेवाळे ,श्रीरंग आप्पा बारणे उपस्थित

राज्यसभेची उमेदवारी देण्याबाबत होणार चर्चा

धुळ्यातील 25 जण दुबईमध्ये अडकले

धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना दिलासा

केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे दुबई मध्ये अडकलेल्या धुळ्यातील नागरिकांना मदत पुरविण्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी दिले आश्वासन

आमदार अनु अग्रवाल यांनी दुबईमध्ये अडकलेल्या धुळेकर नागरिकांना हॉटेल बाहेर न पडण्याच्या दिल्या सूचना

महायुद्धाचा फटका द्राक्ष निर्यातीला; जीएनपाटी बंदरावर २५० कंटेनर अडकले, शेतकऱ्यांना ५० टक्के तोट्याची

-महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष निर्यातीवर मोठं संकट आलं आहे. जीएनपाटी बंधरावर तब्बल २५० कंटेनर 3 हजार 500 टन निर्यातक्षम द्राक्षं अडकली असून निर्यात ठप्प झाली आहे. हा माल वेळेत बाहेर गेला नाही, तर शेतकऱ्यांना स्थानिक बाजारातच विक्री करावी लागणार आहे, ज्यामुळे तब्बल ५० टक्क्यांपर्यंत तोट्याची शक्यता आहे. युद्धजन्य परिस्थितीचा काही निर्यातदार व्यापारी फायदा घेत असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत असुन केंद्र सरकारने तात्काळ पर्यायी देशांच्या बाजारपेठा द्राक्षासाठी खुल्या कराव्यात अन्यथा द्राक्ष उत्पादक शेतक-यांची लुट होणार असल्याची भितीही शेतकरी व्यक्त होत आहे

बदलापूर स्त्री बीज प्रकरणातील सहावा डॉक्टर आरोपी अटक

बदलापूर स्त्री बीज प्रकरणात मोठी अपटेड समोर येतीय. याप्रकरणातील सहावा आरोपी डॉक्टर अमोल पाटीलला अटक करण्यात आलीय. त्याला नाशिकमधून अटक करण्यात आलीय. त्याला आज चिखलोली न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी दिलीय.

सिंधुदुर्गातील 110 नागरीक आखाती देशात अडकले- जिल्हाधिकाऱ्यांची माहीतीलागतील- राजू शेट्टी

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११० नागरिक दुबईत अडकल्याची माहीती जिल्हाधीकारी तृप्ती धोडमीसे यांनी दिली आहे. या नागरीकांची माहिती संकलित करण्यात आली असून १५ जणांना तातडीच्या मदतीची गरज आहे. यासंदर्भात राज्यसरकारशी समन्वय साधून त्यांच्या सूचनेनुसार पावले उचलली जात असल्याची माहीती जिल्हाधीकारी यांनी दिली आहे. दरम्यान जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून नागरिकांनी घाबरून न जाता नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मदत जाहीर करा- अन्यथा परीणाम भोगावे लागतील- राजू शेट्टी

आंबा काजू उत्पादक शेतकरी यंदा हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा थेट परीणाम आंबा काजूवर झाला आहे.

कोकणातील आंबा बागायतदाराला हेक्टरी 5 लाख तर काजू उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी 3 लाख रूपयांची मदत सरकारने जाहीर करावी 6 मार्चच्या अर्थसंकल्पात याची तरतूद करावी अशी आग्रही मागणी शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

सांगलीत अखेर जिल्हा परिषदेला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीबाबत अखेर मुहूर्त ठरला

सांगली जिल्हा परिषदला अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड करण्याबाबत अखेर मुहूर्त ठरला आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत सूचना दिल्या असून 18 मार्च रोजी विशेष सभा घेऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्यात येणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवड झाल्यापासून सांगली जिल्ह्यात भाजपला काठावर समाधान मिळाले आहे.. पण सत्तेपासून लांब राहावे लागले आहे.. एक हाती सत्ता मिळाली नसल्याने समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.. यातच राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी अजित पवार गट व काँग्रेस असे एकत्र मिळून सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष काँग्रेस पक्षाचा होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र 18 तारखेला कोण सत्ता स्थापन करणार हे पाहावे लागणार आहे. मात्र यामुळे भाजपला जिल्हा परिषदेला यंदा सत्ते पासून मुखावे लागणार का हे चित्र स्पष्ट होणार आहे.

मालेगाव महापालिकेच्या विशेष महासभेत नगरसेवक एकमेकांना भिडले

  • अर्थसंकल्प सादर करण्यासाठी घेण्यात आली होती महासभा

  • सत्ताधारी इस्लाम पार्टी व एमआयएम नगरसेवकांमध्ये झाली शाब्दिक चकमक...

  • घरपट्टी वाटप न केल्यामुळे झाला होता वाद...

  • एमआयएम गटनेते अब्दुल मालिक व महापौर पती खालिद हाजी यांच्या झाली होती चकमक...

  • दोन्ही बाजूचे नगरसेवक गेले एकमेकांच्या अंगावर धावून...

  • त्यामुळे सभागृहात काही काळ झाले होते गोंधळाचे तणावाचे वातावरण...

  • जेष्ठ नगरसेवकांनी मध्यस्थी करून वाद मिटविला...

धुळ्यात संताजी नगरात मध्यरात्री 5 दुचाकींना आग; संशयित आरोपी गजाआड

धुळे शहरातील संताजी नगर परिसरात रात्री एका माथेफिरूने घराबाहेर उभ्या असलेल्या तब्बल पाच दुचाकींना लाइटरच्या साह्याने आग लावल्याने परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, चाळीसगाव रोड पोलिसांनी संबंधित माथेफिरूला ताब्यात घेतले असून या घटनेत 5 दुचाकी जळून खाक झाल्याने दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

पुण्यात वाढदिवसासाठी प्रवाशाकडून खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षामधील प्रवाशाला मारहाण करत त्याच्या पत्नीमार्फत २५ हजार रुपये ऑनलाइन खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे.

पुण्यासह राज्यात उन्हाचा तडाखा, सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली

पुण्यात सह राज्यात गेले काही दिवसापासून उन्हाचा तडाखा जाणवत आहे..गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात वाढत असलेल्या उष्णतेमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.मार्चच्या सुरुवातीलाच सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली असून,पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव पूर्णपणे कमी झाला आहे.गेल्या काही दिवसांत सातत्याने तापमानात वाढ होत आहे.पुण्यासह राज्यभरातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमाना ३० अंश सेल्सियसपेक्षा अधिक नोंदवले जात आहे.मार्च महिना सुरू झाल्यामुळे आता उन्हाळ्याचा मोसम सुरू झाला आहे.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार सोमवारी कोरेगाव पार्क येथे ३५.७, शिवाजीनगर येथे ३५.३, तळेगाव येथे ३५.२ अंश सेल्सियस,तर मंगळवारी शिवाजीनगर येथे ३५.५, लोहगाव येथे ३६.४, चिंचवड येथे ३५ अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदवण्यात आले.किनारपट्टीवर येलो आज आणि उद्या येलो अलर्ट दिला असून त्या ठिकाणी काळजी घेण्याची गरज आहे.पुढील काही दिवसात महाराष्ट्रात २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.

भाजपकडून रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी

भाजप कडून रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी बोलतांनी सांगितले की अतिशय मन माझे भरून गेले आहे सामान्य माणसाला त्याच्या कामाची पावती भाजपने न मागता दिली आहे.मी फळाची आशा न करता काम करत होतो त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस बावनकुळे आणि भाजप पक्षाचे आभार मानले आहे. रामराव वडकुते हे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत लोकसभेचे प्रमुख ही त्यांनी होते तर 24 तास पायाला भवरा लावून काम केलं याच कामाची पावती म्हणून मला भारतीय जनता पार्टीने मला हे पद दिले यावेळी त्यांनी बोलताना धनगर समाजाचे प्रश्न दिल्ली दरबारात मांडून असे आश्वासनही दिले.

वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकावर अमरावतीच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची चक्क बनावट स्वाक्षरी

अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळीच्या शाह अंजुमन उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक हारुण शाह बाबा शाह या मुख्याध्यापकाचा धक्कादायक प्रताप उघड...

३८ हजार ८२५ रुपयांच्या देयकावर शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून मुख्याध्यापक हारुण शाह बाबा शाह यांनी पाठविला प्रस्ताव..

वेतन पथकाच्या तपासणीत व्हाईटनर व खोडतोड आढळली..

माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांची गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार...

मुख्याध्यापकाविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी, गाडगे नगर पोलिसांकडून शिक्षण विभागाची तक्रार चौकशीत ठेवण्यात आली.

Sambhajinagar: मुंबई चायनीज ग्रील या हॉटेलवर गुंडांच्या एका टोळक्याने धाड टाकत तोडफोड

छत्रपती संभाजीनगर -

छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास रोडवरील सातारा परिसरात दोन दिवसापूर्वी मध्यरात्री मोठा गोंधळ उडाला होता.

मुंबई चायनीज ग्रील या हॉटेलवर गुंडांच्या एका टोळक्याने धाड टाकत तोडफोड केल्याची घटना समोर आली होती.

या प्रकरणी सातारा पोलीस ठाणे येथे भवर साखरे, मोहित आगळे, शेरा पवार ऊर्फ शरद विनायक पवार, सचिन जाधव, प्रशांत कोळगे, किरण, अजय आणि अन्य तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल दाखल करत त्यातील मुख्य दोन आरोपींना अटक केले

ज्या ठिकाणी त्यांनी हे कृत्य केले त्याच ठिकाणावरून पोलिसांनी धिंड काढली.

Nashik: नाशिकच्या आदिवासी विकास भवनामध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा ठिय्या

नाशिक -

- नाशिकच्या आदिवासी विकास भवनामध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा ठिय्या

- डीबीटी व दीनदयाल योजनेचे पैसे त्वरित जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन

- थेट आदिवासी आयुक्तांना घेराव घालण्याचा प्रयत्न

- अचानक ठिय्या आंदोलनामुळे पोलिसांची व आदिवासी विकास भवनातील कर्मचाऱ्यांची देखील तारांबळ

- तवरित जीआर काढून पैसे वर्ग करण्याची मागणी

Pandharpur: सांगोल्यात वाळूमाफियांचा महसूल पथकाच्या गाडीवर हल्ला

पंढरपूर -

सांगोल्यात वाळूमाफियांचा महसूल पथकाच्या गाडीवर हल्ला

सांगोला तालुक्यातील जवळा येथे वाळू माफियांनी महसूल पथकाच्या गाडीवर दगडफेक करून केला हल्ला....

हल्यात चार महसूल कर्मचारी जखमी....

हल्ल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन...

अवैध वाळू विरोधी कारवाई केल्याच्या रागातून वाळू माफिया अतुल गावडे यांनी‌व त्यांच्या साथीदारांनी केला हल्ला ...

हल्यात तहसीलदारांच्या शासकीय गाडीचे नुकसान..

वाळू माफिया अतुल गावडे व त्याच्या साथीदारांना अटक करण्याची महसूल संघटनेची मागणी...

Kolhapur: कोल्हापुरात पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करणारा तरुण अटकेत

कोल्हापूर -

कोल्हापुरात पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करणारा तरुण अटकेत

गिरगाव परिसरात करवीर पोलिसांची कारवाई

७५ हजाराचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि राऊंड जप्त

Mumbai : ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ठता, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने उद्धव ठाकरेंचा अबोला

मुंबई-

ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ठता

राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने उद्धव ठाकरेंचा अबोला

स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समिती निवडणुकीवबाबत शिवतीर्थावरून एक पाऊल पुढे टाकत मातोश्रीवर विचारणा झाली

मात्र मातोश्रीवरून कोणतेच उत्तर आले नाही, उलट स्वीकृत नगरसेवक परस्पर जाहीर करण्यात आले यात मनसेला विश्वासात घेण्यात आले नाही

मात्र प्रभाग समिती निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना विचारणा

अश्या वेळी राज ठाकरे यांनी तठस्थ भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांना प्रभाग समिती निवडणुकीत बसणार फटका

Pune: सलग पाचव्या दिवशी पुणे ते दुबई विमान रद्द

पुणे -

सलग पाचव्या दिवशी पुणे ते दुबई विमान रद्द

दुबई चे विमानतळ पूर्णपणे कार्यरत नसल्यामुळे विमान सेवा खंडित

पुणे दुबई पुणे असा प्रवास करणाऱ्या दोन कंपनीची विमान सेवा पाच दिवसापासून बंद

पुण्यातून दररोज दुबईला २ विमान करतात प्रस्थान

Mumbai: मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

मुंबई -

महापौर, उपमहापौर आणि समितीच्या अध्यक्षपदांच्या निवडीनंतर आता प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

अंधेरी के पूर्व प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल

आमदार मुरजी पटेल यांचे PA राहिलेल्या भाजप नगरसेवक प्रकाश मुसळे यांचा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

यावेळी महायुतीचे नऊ नगरसेवक त्यासोबतच भाजप उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, शिवसेना आमदार मुरुजी पटेल उपस्थित

यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी अर्ज भरताना जय श्री राम च्या घोषणा दिल्या

Beed: पेट्रोलचा तुटवडा असल्याच्या अफवा, बीडच्या परळीत पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी

इराण-अमेरिका तणावाची अफवा

बीडच्या परळीत पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी

परळीत पेट्रोल मिळणार नसल्याची अफवा:रात्री पासून पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा

Ratnagiri: मुंबई-गोवा महामार्गावर जांभुर्डे गावानजीक कार जळून खाक

रत्नागिरी -

मुंबई-गोवा महामार्गावर जांभुर्डे गावानजीक कार जळून खाक

सुदैवाने जीवितहानी टळली.

मात्र अपघातात गाडीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

लागलेली आग कशामुळे लागली, हे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Yavatmal: यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या पडला विहरीत

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील बाणगाव शेत शिवारातील विहरित बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. विहिरीत पडलेल्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

Solapur: सोलापुरात इराणच्या समर्थनात माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात आंदोलन

सोलापुरात इराणच्या समर्थनात माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात आंदोलन

सदरील आंदोलनाला सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारली आहे.

प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी अमेरिकेच्या विरोधात घोषणा देत माकप कडून काळे कपडे परिधान करून सुरूय आंदोलन

बेंजामिन नेतान्याहू मुर्दाबाद, युद्ध विराम त्वरित करा अशा आशयाचे फलक लावून सुरूय आंदोलन

दरम्यान सोलापूर मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी फेसबुक पोस्ट करत इस्राईलला दिले आहे समर्थन

त्यामुळे इराण - इस्राईल वादात आता सोलापुरातील राजकारण्यांनी उडी घेतली आहे.

Yewala: येवल्यात बियाणे दुकान फोडून चोरट्यांनी रोकड केली लंपास

नाशिकच्या येवला शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या, घरफोडी, चैन स्नॅचिंग, या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, काल मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान अट्टल सीड्स या बियाणे दुकानात चोरट्यांनी शटर चे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला त्यानंतर गल्ल्यातील रोकड चोरून नेली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाला आहे. दरम्यान गेला अनेक दिवसांपासून येवला शहर पोलिसांचे संख्याबळ कमी असूनचोऱ्यांचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान पोलीस सीसीटीव्ही च्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे

Shirdi: साई चरणी 46 लाख रुपये किमतीचं सोनं अर्पण

साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साई चरणी 6 सुवर्ण ‘ॐ’ अक्षर अर्पण केलेत.. 309 ग्रॅम वजनाच्या या सुवर्ण दानाची किंमत 46 लाख 9 हजार इतकी आहे.. आकर्षक नक्षीकाम असलेली ही ‘ॐ’ अक्षरे साईबाबांच्या मूर्तीमागील भिंतीवर बसवण्यात आली आहेत.. साईबाबा संस्थानच्या वतीने सुरेश हावरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आलाय..

मुंबई–अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; टेम्पोला भीषण आग

मुंबई–अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पालघर तालुक्यातील सोमट्याजवळ धावत्या टेम्पोला अचानक भीषण आग लागल्याने एकाच खळबळ उडाली. मध्यरात्री ही घटना गुजरात वाहिनीवर घडली असून, काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची तीव्रता इतकी होती की टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला. या भीषण आगीत चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, तो टेम्पोमधील साहित्यांसह जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, टेम्पोतील क्लीनर गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे हॉटेलला लागली आग

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे हॉटेलला लागली आग

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

आग लागल्याचे लक्षात येताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी हॉटेलमधले पाच ते सहा सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला

जळगाव व नशिराबाद येथील अग्निशमन दलाच्या बंबानी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर मिळवले नियंत्रण

आगीच्या घटनेत हॉटेलचे मोठे आर्थिक नुकसान

मांगूर माशांची तस्करी करणारा ट्रक पकडला, 4 हजार किलो मासे केले नष्ट

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिर्डी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित मांगूर माशांची तस्करी करणारा ट्रक पकडला आहे.. शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव बायपास येथून पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेत मानवी आरोग्यास हानिकारक चार हजार किलो मांगूर मासे नष्ट केले आहेत.. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 लाख रुपये किमतीचे मांगूर मासे आणि 25 लाख रुपये किमतीचा ट्रक असा 29 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे..

Akola: अकोल्यात ऑटो रिक्षा पलटी, एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात मजुरांना घेऊन जाणारा ऑटो रिक्षा पलटी झालाय, यात एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.. गावंडगाव शिवारातील पांगरताटी मार्गावरील पुलाजवळ मजुरांचा प्रवासी ऑटो रिक्षा अचानक पलटी झाला. या अपघातात ऑटोखाली दबून राजू जाधव या मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे... तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या.. त्यांच्यावर वाडेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत...

Sindhudurg: सिंधुदुर्गात ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याची चादर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र आज पुन्हा दाट धुके पाहायला मिळाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहाटे पासून दाट धुके पडल्याने रस्ते धुक्यात हरवले होते. ऐन आंबा, काजूच्या हंगामात धुके पडत असल्यामुळे याचा थेट परीणाम मोहरावर होणार आहे. आधीच हापूस आंबा मोहरावर खार पडल्यामुळे जळून गेला आहे त्यातच पुन्हा धुके पडत असल्यामुळे याचा मोठा परीणाम आंबा काजू पिकावर होणार आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बागायतदार शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.

Pune: पुणे जिल्ह्यातील दुबईत अडकलेल्या सर्व लोकांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

पुणे जिल्ह्यातील दुबईत अडकलेल्या सर्व लोकांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

युएई गव्हर्नमेंट केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या समन्वय करून भारतात परतण्यासाठी प्रयत्न सुरू

कालच्या फ्लाईट मध्ये विद्यार्थी आणि मुंबईतील काही नागरिक काल भारतात परतले

आजच्या फ्लाईट मध्ये महाराष्ट्रातील आणि पुण्यातील नागरिकांना विद्यार्थ्यांना साठी राज्य सरकारचे प्रय

इराण-इस्त्रायल युद्धमुळे सोलापुरात राजकीय वाद

इराण-इजराईल युद्धमुळे सोलापुरात राजकीय वाद

इराणच्या समर्थनाथ आज माजी आमदार नरसय्या आडम यांचे आंदोलन

इजराईल आणि अमेरिका हे युद्धखोर असल्याची टीका करतं आडम यांनी पुकारलं आंदोलन

आज सकाळी 11 वाजता जिल्हापरिषद कार्यालयाच्या पूनम गेटसमोर होणार आंदोलन

दुसरीकडे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी इजराईलच्या समर्थनाथ केली फेसबुक पोस्ट

दहशतवाद मुक्त जागासाठी इजराईलला पाठिंबा असल्याची पोस्ट आमदार कोठे यांनी केलीय

त्यामुळे सोलापुरात युद्धचे राजकीय परिणाम होताना दिसता्यात

इंगळी येथे भूस्खलन; ७० फूट विहिरीत पोकलँड कोसळले, दोघे बचावले

कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी येथे सहा मोट विहिरीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक मुरूम घसरल्याने सुमारे २५ टन वजनाचे पोकलँड मशीन ७० फूट खोल विहिरीत कोसळले. या दुर्घटनेत ऑपरेटरसह दोघेजण पाण्यात बुडाले; मात्र ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. सिंता भारती व आशिष शरमण अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर हुपरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी पोटातील दूषित पाणी बाहेर काढून निरीक्षणाखाली ठेवले आहे. विहिरीच्या पुनर्बांधणीसाठी ३ कोटी ४२ लाखांचा निधी मंजूर असून काम सुरू असताना हा प्रकार घडला. पोकलँड बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात येणार आहे. दरम्यान, लगतच्या रस्त्याला आणि मस्जिदीला भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.

Nashik: नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

नाशिकच्या तपोवन वृक्ष तोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मनसे पदाधिकारी आणि ॲड नितीन पंडित यांनी तपोवन वृक्ष तोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलीय याचिका

झाड तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी नितीन पंडित यांनी दाखल केलीय याचिका

मागील सुनावणीत पालिका प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने सुनावणी ढकलण्यात आली होती पुढे

शहरातील कुसुमाग्रज उद्यान आणि शहरातील इतर भागात झालेली बेकायदेशीर वृक्षतोड देखील आज न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा

प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास एकतर्फी सुनावणी घेण्याची मागणी आज याचिकाकर्ते करणार

आजच्या सुनावणीत तरी महापालिकेच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येते का ? याकडे लक्ष

Pune: पुण्यात धुलिवंदनाच्या कार्यक्रमात स्टेज कोसळले

कार्यक्रमाच्या आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल

स्टेज कोसळल्यामुळे १२ जण जखमी तर चौघांना गंभीर दुखापत

कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टेजचा एक आडवा लोखंडी बीम कोसळला त्यात काही लोक जखमी झाले आहेत

याबाबत गंभीर दुखापत झालेल्या पार्थ श्रीराम पवार (वय १९) याने पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार कार्यक्रमाचे आयोजक शुभम मुकेश घोष याच्याविरुद्ध गुन्हा दाखल

विमानतळ बाधित शेतकऱ्यांना गोखले इन्स्टिट्यूट देणार गुंतवणुकीचे धडे

विमानतळ बाधित शेतकऱ्यांना गोखले इन्स्टिट्यूट देणार गुंतवणुकीचे धडे

पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाकडून महत्त्वाचा निर्णय

राज्य सरकारच्या पुढाकारातून आर्थिक नियोजनाचे आणि गुंतवणुकीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय

अचानक आलेले पैसे चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होणे यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी निर्णय

Pune: पुण्यात तीन दिवसात 301 मद्यपी चालकांवर कारवाई

पुण्यात तीन दिवसात 301 मद्यपी चालकांवर कारवाई

मद्य सेवन करून वाहन चालकांच्या विरुद्ध शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत तीन दिवसात ३०१ चालकांवर कारवाई केली

अपघातांना आळा घालण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे

वाहतूक शाखेने 27 फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत शहरातील 30 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती

मद्य सेवन करून वाहन चालविताना आढळलेल्या 301 जणांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई

Pune: राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार

राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार

वातावरण बदलामुळे तापमान वाढले

पुढील दोन दिवसात पुण्यासह राज्यातील तापमान वाढ होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

विदर्भात काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

गेल्या काही दिवसांपासून तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले

Pune: पुणे महापालिकेचा 2026- 27 चा अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार

पुणे महापालिकेचा 2026- 27 चा अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार

आयुक्त नवल किशोर राम स्थायी समिती समोर अर्थसंकल्प सादर करणार

९ तारखेला होणार पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

गेल्या चार वर्षातला प्रशासक संपल्याने स्थायी समिती समोर अर्थसंकल्प सादर करावा लागणार

आयुक्त यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करून तरतुदीचा समावेश करून स्थायी समिती सर्वसाधारण सभेसमोर अर्थसंकल्प ठेवेल

Pratap Sarnaik: प्रसंगी विरोधात बसू ;पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही: पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भुमिका

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम शब्दांत भूमिका स्पष्ट केली आहे.“सत्ता महत्त्वाची असली,तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे.प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू;पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

Bhandara: भंडाऱ्यात धूळवडीला गालबोट,रावणवाडी जलाशयात बोट उलटली

होळीच्या उत्साहात नागपूरहून पर्यटनासाठी आलेल्या एका मित्रमंडळीच्या ग्रुपवर काळानं घाला घातला आहे. भंडाऱ्याच्या प्रसिद्ध रावणवाडी जलाशयात जलपर्यटन करताना बोट (डोंगा) उलटल्यानं नागपूरचा एक ३० वर्षीय तरुण बुडाला. सौरभ मेहरा असं मृत तरुणाचं नावं असून, तो नागपूरच्या धरमपेठ परिसरातील रहिवासी आहे. धुळवडीची सुट्टी साजरी करण्यासाठी नागपूरहून २० ते २२ तरुणांचा एक गट रावणवाडी इथं सहलीसाठी आला होता. यातील ५ ते ६ तरुण जलाशयात असलेल्या एका डोंग्यातून (स्थानिक बोट) फिरण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, काठापासून काही अंतरावर जाताचं पाण्याचा अंदाज नं आल्यानं हा डोंगा अचानक उलटला. बोटीतील इतर ५ जण पोहत कसेबसे काठावर आले. सौरभला पाण्याचा अंदाज नं आल्यानं तो खोल पाण्यात बुडाला आणि बेपत्ता झाला. अड्याळ पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक मच्छिमारांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळपर्यंत सौरभचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, अंधार झाल्यामुळे आजची शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा बचाव पथकाकडून शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.

Ratnagiri: रत्नागिरीत रुग्णालयात दाखल झाला संकासूर...

कोकणात सध्या शिमगोत्सव सुरु आहे आणि शिमगोत्सवाचं प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे संकासूर ...शिमगोत्सवात हा संकासूर तुम्हाला सर्रास कोकणातील रस्त्यावर दिसेल..संकासूराला देवाचा मान दिला जातो त्यामुळे अनेकजण त्याचा आशिर्वाद घेत असतात हाच संकासूर रत्नागिरीतील सांबरे रुग्णालयात रुग्णांना आशिर्वाद देण्यासाठी दाखल झालाय.संकासूराच्या येण्यानं रुग्णांमध्ये देखील एक नवी उर्जा निर्माण झाली होती.रुग्णालयात आलेला संकासून अनेकांना समाधान देऊन गेला..

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

एक रुपयात पिक विमा बंद करून त्या ऐवजी पीक कापणी प्रयोगाच्या निकषावर पिक विमा देण्याचा निर्णय विमा कंपन्यांनी घेतला या नव्या निकषानुसार यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत दिली जाणार आहे या अहवालानुसार यंदा पिकाचे उत्पन्न कमी झाले आहे यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची अपेक्षा आहे पीक विम्याचा अंतिम अहवाल राज्यस्तरावरून प्रसिद्ध होणार आहे यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात पीक परिस्थिती चिंताजनक आहे.

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

Summary

सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ४४९ वसतिगृहांपैकी ४१६ वसतिगृहांच्या नावांना तसेच यापुढे सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या मुलांच्या वसतिगृहांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह” आणि मुलींच्या वसतिगृहांना “सावित्रिबाई फुले शासकीय वसतिगृह” अशी नावे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे.

सध्या अनेक वसतिगृहांच्या नावांमध्ये ‘मागासवर्गीय’ हा शब्द वापरण्यात आला आहे. ‘मागासवर्गीय’ हा शब्द समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांकडे निर्देश करतो व त्यातून विषमता अधोरेखित होते. त्यामुळे संस्थांची ओळख एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित राहते आणि समाजाचा दृष्टिकोनही त्यानुसार घडतो. ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहांच्या नावातील ‘मागासवर्गीय’ हा शब्द वगळून त्यांना महापुरुषांची नावे देण्याचा

युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल महाग होणार, अफवेने नांदेड पाठोपाठ परभणीत ही पेट्रोल पंपांवर गर्दी

युद्धाच्या पारश्वभूमीवर पेट्रोल महाग होणार आहे अशा अफवेने नांदेड पाठोपाठ परभणीत ही पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी उसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.शहरातील भरोसे,दुर्रानी तसेच आर आर पेट्रोल पंपासह अनेक पंपवर दुचाकी चालकांनी मोठी गर्दी केली आहे.ज्यामुळे पेट्रोल पंप चालक ही हैराण झाले आहे.प्रशासनाने ही अफवा असून इंधन तुटवडा होणार नाही असे आवाहन करावे जेणेकरून ही गर्दी कमी होवून नागरिक अफवांना बळी पडणार नाहीत अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com