Sambhajinagar News : अश्लील व्हिडीओ पाहिल्याचे सांगत सायबर गुन्हेगाराकडून ब्लॅकमेलिंग; शेकडो जणांना मेलद्वारे धमकी

Sambhajinagar News : काहीजण वेगवेगळ्या साइटवर जाऊन अश्लील व्हिडीओ पाहत असतात. अशा प्रकारे व्हिडीओ पाहणाऱ्यांना हेरून सायबर गुन्हेगारांकडून पैसे उकडण्याचा धंदा सुरु केला आहे
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : पॉर्न साईट पाहिली म्हणून अनेक जणांना धमकीचे मेल येत असून ब्लॅकमेलिंग (Sambhajinagar) करण्याचे प्रकार संभाजीनगरमध्ये उघडकीस आले आहेत. आतापर्यंत शेकडो जणांना असे मेल प्राप्त झाले असून (Cyber Crime) सायबर गुन्हेगारांनी ब्लॅकमेलिंग केल्याचही पोलीस तपासात समोर आले आहे. (Latest Marathi News)

Cyber Crime
Chandrapur News : चंद्रपूरमध्ये दीडशे नागरिकांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

पॉर्न व्हिडिओच्या साईटवर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील काहीजण वेगवेगळ्या साइटवर जाऊन अश्लील व्हिडीओ पाहत असतात. अशा प्रकारे व्हिडीओ पाहणाऱ्यांना हेरून सायबर गुन्हेगारांकडून पैसे उकडण्याचा धंदा सुरु केला आहे. त्यांना ब्लॅकमेलिंग करण्याचे काम केले जात आहे. संभाजीनगरमध्ये असे प्रकार उघडकीला आले असून थेट ईमेल करून धमकी देत ब्लॅकमेलिंग केले जात आहे.   

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cyber Crime
Nandurbar : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतक-यांचा राेष, प्रसंगी आंदाेलन छेडण्याचा दिला इशारा

सायबर पोलिसांकडून चौकशी 

तुम्ही केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉर्न साईट्स पाहत असून केंद्र सरकारच्या तांत्रिक तपासा तुम्ही कैद झाला आहात. अशा स्वरूपाचे (CBI) सीबीआयचे एक बनावट वॉरंट आणि समन्स असलेला एक मेल प्राप्त होत आहे. मात्र (Cyber Police) सायबर पोलिसांनी याची चौकशी केली असता हे बनावट मेल असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून अशा प्रकारे आलेल्या धमकीच्या इमेलला कुणीही घाबरून पैसे देऊ नका; असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com