Chandrapur News : चंद्रपूरमध्ये दीडशे नागरिकांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

Food Poisoning : या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. माजरी येथे काल नवसाची पूजा होती. यानिमित्त रात्री जेवण ठेवण्यात आले होते. अंदाजे पाचशेवर लोक या पूजेत सहभागी झाले होते.
Chandrapur News
Chandrapur NewsSaam TV

संजय तुमराम

Chandrapur Food Poisoning News :

चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. तब्बल दीडशेहून अधिक लोकांना विषबाधा झालीये. या सर्व नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आसून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Chandrapur News
Chandrapur News: 'ते 15 लाख पहिले द्या नं तुम्ही...' मतदाराचा थेट सवाल! चंद्रपुरातील Video Viral

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दीडशेहून अधिक लोकांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. माजरी येथे काल नवसाची पूजा होती. यानिमित्त रात्री जेवण ठेवण्यात आले होते. अंदाजे पाचशेवर लोक या पूजेत सहभागी झाले होते.

पूजेनंतर सर्वांनी जेवण केले, महाप्रसादाचा लाभ घेतला. जेवण करून कार्यक्रम उरकल्यानंतर सर्व व्यक्ती घरी गेल्या. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. पाहता पाहता शंभरावर लोकांना विषबाधा झाल्याचे लक्षात आले.

नंतर हा एकदा वाढतच गेला त्यामुळे हॉस्पीटल देखील कमी पडू लागले. त्यामुळे काही जणांना भद्रावती आणि वरोरा येथे हलवण्यात आले. या सर्व रुग्णांना अन्नातून विषबाधा झाल्याचे कारण समोर आले आहे.

सध्या रुग्णांवर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलेय. सार्वजनिक ठिकाणी जेवण ठेवताना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. या विभागाशी संपर्क साधला असता अन्न व औषध प्रशासन अधिकारी गिरीश सातकर यांनी, कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट करून चौकशीसाठी जात असल्याचे सांगितले.

Chandrapur News
Dengue Patients : धाराशिवच्या पांगरदरवाडीत डेंग्यूची साथ; महिनाभरात २५ रुग्ण पॉझिटिव्ह

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com