Dengue Patients : धाराशिवच्या पांगरदरवाडीत डेंग्यूची साथ; महिनाभरात २५ रुग्ण पॉझिटिव्ह

Dharashiv News : मागील काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. यात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारख्या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. यामुळे दवाखान्यात देखील रुग्णांची गर्दी पाहण्यास मिळत आहे
Dengue Patients
Dengue PatientsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे डेंग्यूच्या साथ रोगाने थैमान घातले आहे. गेल्या महिभरापासून या गावात (Dengue) डेंग्यूचे तब्बल २५ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य विभाग ऍक्टिव्ह मोडवर आला आहे. डेंग्यूची साथ रोखण्यासाठी गावात उपाय योजना (dharashiv News) करण्यास सुरवात झाली आहे. (Live Marathi News)

Dengue Patients
Sambhajinagar News : शेंद्रा, जालना एमआयडीसीसह ऑरिक सिटीचा दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

मागील काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. यात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारख्या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. यामुळे दवाखान्यात देखील रुग्णांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. इतकेच नाही तर वातावरणामुळे डासांची उत्पत्ती देखील होत असून डेंग्यूसारखे आजार डोके वर काढत आहेत. यामुळेच धाराशिवच्या पांगरदरवाडी गावात डेंग्यूची साथ पसरली आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून (Health Department) उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dengue Patients
Sangli News : चक्क सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी; खास बनविला आठ तोळ्याचा वस्तरा

मागील महिनाभरात गावात २५ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असुन डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घाडगे यांच्या पथकाने गावात येऊन पाहणी केली. तसेच गावात आरोग्य विभागाची एक टीम ताल ठोकून आहे. डेंग्यू साथ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com