Dengue Cases In Nashik: नाशिकमध्ये डेंग्यूचा डंख कायम; नववर्षाच्या पहिल्याच ५ दिवसात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

Nashik Dengue News: नोव्हेंबरमध्ये २७५ तर डिसेंबरमध्ये २०५ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच डेंग्यूचे रुग्ण आणखी वाढू लागलेत. त्यामुळे नाशिककरांसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे.
Dengue Cases In Nashik
Dengue Cases In NashikSaam TV
Published On

Nashik News:

नाशिकमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चाललीये. नव वर्षाच्या पहिल्याच ५ दिवसांत डेंग्यूने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. ५ जानेवारीपर्यंत डेंग्यूचे ११ रुग्ण आढळले आहेत. पावसाळ्यात होणारा डेंग्यूचा उद्रेक यंदा पावसाळा संपल्यानंतरही कायम आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य यंत्रणांसाठी हा चिंतेचा विषय ठरतोय.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dengue Cases In Nashik
Dengue Outbreak In Buldhana : बुलढाण्यात डेंग्यूचा कहर, चिखलीत सर्वाधिक रुग्णांची नाेंद

मागील वर्षभरात नाशिकमध्ये डेंग्यूचे तब्बल ११९१ रुग्ण आढळले होते. नोव्हेंबरमध्ये २७५ तर डिसेंबरमध्ये २०५ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच डेंग्यूचे रुग्ण आणखी वाढू लागलेत. त्यामुळे नाशिककरांसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे.

डेंग्यूची लक्षणे

डास चावल्यानंतर त्वरित एका आठवड्यानंतर त्याची लक्षणे दिसून येतात. रुग्णाला 2 ते 7 दिवस जास्त ताप येतो. त्याच वेळी, लक्षणांमध्ये अचानक उच्च ताप, तीव्र डोकेदुखी, शरीरावर रक्ताच्या गुठळ्या येतात आणि शरीरात पांढऱ्या रक्तपेशींचा अभाव होतो. डोळ्यांच्या मागे दुखणे आणि डोळे हलवताना वेदना, स्नायू (शरीर) आणि सांध्यातील वेदना, छाती आणि वरच्या अंगावर गोवरसारखे पुरळ येणे, चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे अशा लक्षणांचा समावेश होतो. तर लहान मुलांमध्ये डेंग्यू तापाची लक्षणे प्रौढांच्या तुलनेत सौम्य असतात.

डेंग्यू पासून बचावाचे कोणते मार्ग आहेत?

  • जर तुम्हाला डेंग्यूपासून वाचायचे आहे तर तुमचे घर स्वच्छ ठेवा.

  • डेंग्यूचे डास सकाळी किंवा संध्याकाळी जास्त सक्रिय असतात.

  • त्यामुळे यावेळी बाहेर जाणे टाळा.

  • आपली त्वचा झाकून ठेवा.

  • एडीस प्रजातीचा डास स्वच्छ आणि अस्वच्छ पाण्यात पैदास करतो म्हणून पाण्याचे पात्र किंवा टाकी नेहमी झाकून ठेवा.

Dengue Cases In Nashik
Dengue In Kolhapur: कोल्हापुरात डेंग्यूचं थैमान; हजारांहून अधिक नागरिकांचा जीव धोक्यात, एकाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com