Dengue In Kolhapur: कोल्हापुरात डेंग्यूचं थैमान; हजारांहून अधिक नागरिकांचा जीव धोक्यात, एकाचा मृत्यू

Dengue Cases Increase: गावात एक हजाराहून अधिक व्यक्तींना डेंग्यूची लागण झाली आहे.
Dengue In Kolhapur
Dengue In KolhapurSaam TV
Published On

रणजीत माजगावकर

Kolhapur News:

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावात डेंग्यूचा कहर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आळते गावात डेंग्यू रोगाने थैयथयाट केलाय. गावात एक हजाराहून अधिक व्यक्तींना डेंग्यूची लागण झाली आहे. (Latest Marathi News)

Dengue In Kolhapur
Dengue Patient: यंदाच्या पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाचे २१ हजार रुग्ण; राज्याची राजधानी मुंबई आहे अव्वलस्थानी

एका बाजूला देशात गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम रावबली जात आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या आळते गावात अस्वच्छतेमुळे डेंग्यूची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामस्थ सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत उपचार घेतायत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनही हतबल झालं आहे.

डेंग्यूच्या वाढत्या प्रभावामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होतानाचं चित्र पाहायला मिळतंय. गावात डेंग्यूमुळे १५ दिवसांपूर्वीच एका महिलेचा मृत्यू झाला आहे. लहान मुलं आणि महिलांमध्ये डेंग्यूची लागण पटकण होत आहे. घरांमध्ये कोणीही पाणी साठवून ठेवू नका असं आवाहान नागरिकांना केलं जातंय.

रुग्ण संख्या वेळीच नियंत्रणात न आल्यास मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

डेंग्यूची लक्षणे

ताप

डोकेदुखी

शरीर वेदना

मळमळ

पुरळ

अशी लक्षणे जाणवत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका. यावर तातडीने उपचार घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती औषधे आणि जेवणाचे पथ्य पाळा.

Dengue In Kolhapur
Kolhapur Crime News: संतापजनक! गतिमंद मुलीवर नराधमाने केला अत्याचार, गर्भवती राहिल्याने उघडकीस आला प्रकार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com