Sambhajinagar News : शेंद्रा, जालना एमआयडीसीसह ऑरिक सिटीचा दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

chhatrapati sambhajinagar marathi news : शेंद्रा एमआयडीसी, ऑरिक सिटी आणि जालना एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी साेमवारी पिंपळवाडी येथे फुटली.
 no water supply in shendra and jalna midc area today and tomorrow near chhatrapati sambhajinagar
no water supply in shendra and jalna midc area today and tomorrow near chhatrapati sambhajinagar Saam Digital
Published On

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा एमआयडीसी (shendra midc), ऑरिक सिटी (auric city shendra aurangabad) आणि जालना एमआयडीसी (jalna midc) याचा पाणीपुरवठा आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवार) बंद राहणार आहे. स्थानिकांनी याची नाेंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेंद्रा एमआयडीसी, ऑरिक सिटी आणि जालना एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी साेमवारी पिंपळवाडी येथे फुटली. यामुळे माेठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. परिणामी काळ या भागात नदीचे स्वरूप आले होते.

 no water supply in shendra and jalna midc area today and tomorrow near chhatrapati sambhajinagar
Buldhana: चिखली गौणखनिज प्रकरण, 4.13 कोटींचा दंड : तहसीलदार संतोष काकडे

जायकवाडी पंपहाऊस पासून खोडेगाव जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून नेणारी एमआयडीसीची जलवाहिनी पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावर (paithan chhatrapati sambhajinagar road) पिंपळवाडी येथे रस्त्याचे काम सुरू असताना फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. जवळपास 200 फूट उंच पाण्याचे फवारे उडत असल्याने या मार्गावर काही काळ नदीच स्वरूप आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

ही जलवाहिनी फुटल्याने त्याचा फटका आता औद्योगिक वसाहतीला बसला आहे. यामुळे शेंद्रा एमआयडीसी, ऑरिक सिटी आणि जालना एमआयडीसीचा पाणीपुरवठा ठप्प झाला. तसेच आज आणि उद्याही बंद राहणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

 no water supply in shendra and jalna midc area today and tomorrow near chhatrapati sambhajinagar
Nandurbar : होळीपूर्वीच निसर्गाची सातपुड्यात रंगाची उधळण, रंगीबेरंगी पळसाच्या फुलांनी बहरला सातपुडा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com