Buldhana: चिखली गौणखनिज प्रकरण, 4.13 कोटींचा दंड : तहसीलदार संतोष काकडे

Chikhali Latest Marathi News : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील गौैणखनिज तस्करांना चाप लावण्याचे काम तहसीलदार संतोष काकडे यांनी जोरदारपणे सुरू केले आहे.
chikhali tahsildar fined 4 crore in illegal mining case
chikhali tahsildar fined 4 crore in illegal mining case saam tv
Published On

Buldhana :

बुलढाणा जिल्ह्यात गौणखनिज तस्करांना प्रशासनाने चांगेलच वठणीवर आणल्याचे चित्र आहे. या जिल्ह्यातील चिखली तहसीलदार यांनी गौणखनिज तस्करांना तब्बल ४.१३ कोटींचा दंड ठोठावला आहे. दरम्यान अवैधरित्या गौण खनिजाच्या प्रकरणात गय केली जाणार नाही असा इशारा तहसीलदार संतोष काकडे (chikhali tashildar santosh kakade) यांनी दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील गौैणखनिज तस्करांना चाप लावण्याचे काम तहसीलदार संतोष काकडे यांनी जोरदारपणे सुरू केले आहे. आठवडाभरात त्यांनी अवैधरित्या गौण खनिज उत्खनाच्या वेगवेगळ्या प्रकरणात संबंधितांवर तब्बल ४ कोटी १३ लाख ४० हजार रुपयांचे दंड ठोठावला आहे. त्यांच्या या कारवाईमुळे अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करणार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

chikhali tahsildar fined 4 crore in illegal mining case
Dodamarg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन, अस्तित्व अधोरेखित

चिखली तालुक्यातील मौजे भोकर येथील सरकारी ई क्लास गट नं. १७९ मध्ये प्रशासनाला जवळपास १ हजार ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे आढळून आले होते, तर सदरचे उत्खनन सुपरवायझर रानुबा सखाराम जाधव यांनी केल्याचे चौकशीत समजले. तर उत्खनन केलेल्या मुरमापैकी अंदाजे ३०० ते ३५० ब्रास मुरूम वाहतूक केल्याचे प्रशासनास निदर्शनास आले होते. (Maharashtra News)

या प्रकरणात एस.आर.एल. कन्स्ट्रक्शन (जालना) यांनी अवैधरित्या ८५० ब्रास मुरूम अवैधरित्या उत्खनन केल्याने त्यांचेवर (महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) नुसार) एकूण ७५० ब्रास मुरूम करिता प्रतिब्रास रुपये ३ हजार बाजार मूल्याप्रमाणे होणारे एकूण किंमत २५ लाख ५० हजारच्या पाचपट दंड ०१ कोटी २७ लाख ५० हजार अधिक ८५० ब्रास मुरमा करता रॉयल्टी प्रति ब्रास ६०० रुपये प्रमाणे ०५ लाख १० हजार असा एकूण दंड ०१ कोटी ३२ लाख ७ हजार रुपये असा दंड आकारण्यात आलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

chikhali tahsildar fined 4 crore in illegal mining case
Nandurbar : होळीपूर्वीच निसर्गाची सातपुड्यात रंगाची उधळण, रंगीबेरंगी पळसाच्या फुलांनी बहरला सातपुडा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com