Dodamarg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन, अस्तित्व अधोरेखित

Tiger Roar In Dodamarg : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र अधिवासाच्या दृष्टीने देखील दोडामार्ग तालुका महत्त्वाचा आहे. वाघांच्या प्रजननाचे पुरावे आहेत.
tigers roar in dodamarg sahyadri tiger reserve corridor
tigers roar in dodamarg sahyadri tiger reserve corridorsaam tv

- विनायक वंजारे

Sindhudurg :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग (Dodamarg) तालुक्यातील तळकट कुभंवडे मार्गावर नागरिकांना नुकतेच पट्टेरी वाघाचे दर्शन (tiger) झाले. दोडामार्ग मध्ये जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व यापूर्वी देखील अधोरेखित झाले आहे. नागरिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन हाेताच त्यांनी लागलीच वाघाचे छायाचित्र आणि व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. (Maharashtra News)

दोडामार्ग तालुक्यात पट्टेरी वाघाचा अधिवास फार पूर्वीपासून आहे. हा परिसर सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गामधील महत्त्वाचा परिसर आहे. या परिसरातून वाघांच्या प्रजननाचे पुरावे मिळाले आहेत.

tigers roar in dodamarg sahyadri tiger reserve corridor
लाेकसभा निवडणुकीची तारीख जाहीर हाेताच समाज माध्यमात 7 ची धूम; 7 टप्पे, 7तारा, 7 मे, 007 उदयनराजे

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र अधिवासाच्या (sahyadri tiger reserve corridor) दृष्टीने देखील दोडामार्ग तालुका महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत देखील दोडामार्ग तालुक्यातील पश्चिम घाटाचे पर्यावरणीय संवेदशनशील क्षेत्र अजून घोषित झालेले नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य सरकार व वन विभाग या दृष्टीने गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वाघ आणि इतर वन्यजीवांचा अधिवास आणि त्यांचे भ्रमणमार्ग सुंरक्षित करण्याचे दृष्टीने राज्य सरकाराने तातडीने हालचाल करणे गरजेचे आहे. मुंबईत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या यासंदर्भातील याचिकेवर वन विभागाने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.

Edited By : Siddharth Latkar

tigers roar in dodamarg sahyadri tiger reserve corridor
Maharashtra Election 2024 : शरद पवारांना जुना राग काढायचा असेल, शाहू महाराजांना निवडणुकीला उभं करण्याचे षडयंत्र : संजय मंडलिक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com