Nandurbar : शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतक-यांचा राेष, प्रसंगी आंदाेलन छेडण्याचा दिला इशारा

Nandurbar Latest Marathi News : शहादा तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी लांबून लावून येतात. सर्व गाेष्टींचा विचार करुन शेतक-यांसाठी सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.
farmers demands faclitiy in shahada bazar samiti nandurbar
farmers demands faclitiy in shahada bazar samiti nandurbar saam tv

- सागर निकवाडे

Shahada Krushi Utpanna Bazar Samiti :

शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी कुठल्याही सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात सध्या ४२ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचले आहे. शेतकऱ्यांना बसण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची गरज भासते परंतु या सुविधा नसल्याने शेतक-यांचे हाल हाेताहेत. (Maharashtra News)

या बाजार समितीत भर दुपारी शेतकऱ्यांच्या मालाच्या लिलाव हाेत असताे. त्यामुळे शेतकऱ्यांना भर उन्हात उभे राहावे लागते. येथे पिण्यासाठी पाणी देखील नसते. त्यामुळे अनेकांना पाण्यासाठी लिलाव साेडून बाहेर पाण्यासाठी जावे लागते.

farmers demands faclitiy in shahada bazar samiti nandurbar
Hatkanangale Constituency: हातकणंगले मतदारसंघात पंचरंगी लढतीची शक्यता, माेदींना पंतप्रधान पाहण्यासाठी अपक्ष आमदार निवडणुकीच्या रिंगणात

शहादा तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी लांबून लावून येतात. शेतकऱ्यांना बाजार समितीत सुविधा मिळाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. लवकरात लवकर सुविधा न मिळाल्यास आंदोलन छेडू असा इशारा शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनास दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

farmers demands faclitiy in shahada bazar samiti nandurbar
Bhandara Gondia Lok Sabha Constituency: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 1243 मतदारांनी बजावला हक्क

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com