Bhandara Gondia Lok Sabha Constituency: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 1243 मतदारांनी बजावला हक्क

गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार भंडारा गाेंदिया लाेकसभा मतदारसंघात अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली.
1243 voters cast their vote in bhandara gondia lok sabha election 2024
1243 voters cast their vote in bhandara gondia lok sabha election 2024saam tv
Published On

- शुभम देशमुख

Bhandara Gondia Constituency :

चुनाव का पर्व, देश का गर्व, ह्या घोषवाक्यानुसार भारतीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा- गोंदिया मतदारसंघासाठी (Bhandara Gondia Lok Sabha Constituency) येत्या 19 एप्रिलला मतदान होणार आहे. यावर्षी आयोगाने प्रथम गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील 1243 मतदारांनी घेतला असून त्यांनी मताधिकार बजावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

मूळ साकोली येथे रहिवासी असणाऱ्या जैनबी जब्बार कुरेशी ह्या 98 वर्षाच्या असून आजारामुळे त्या अंथरुणाला खिळून आहेत. अनेक वर्ष झाले त्यांनी मतदानामध्ये सक्रिय मतदान केले नव्हते. कारण मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी त्यांना आधार घेत जावे लागत होते.

त्यामुळे मौल्यवान मताधिकारापासून त्या वंचित राहत होत्या, मात्र आयोगाने गृह मतदान सुविधा उपलब्ध करून दिल्याने या लोकसभा निवडणुकीसाठी जैनबी जब्बार कुरेशी यांनी मतदान केले.

दोन मुलं आणि दोन मुली असलेल्या जैनबी यांच्या कुटुंबांमध्ये त्यांचे पुत्र कलीम जब्बार कुरेशी यांनी गृह मतदान प्रक्रियेविषयी समाधान व्यक्त केले. तसेच मतदान प्रक्रिया गोपनीयतेने पार पाडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

1243 voters cast their vote in bhandara gondia lok sabha election 2024
Tuljapur : तुळजाभवानीचे 207 किलो सोने, 2570 किलो चांदी वितळवण्याचा निर्णय; शिर्डी व सिध्दिविनायक मंदीर प्रमाणे प्रक्रिया

जिल्ह्यामध्ये गृह मतदानाची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पहिल्या दोन दिवसात 1243 मतदारांनी मताधिकार बजावला. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

याच अनुषंगाने लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ 7 एप्रिल रोजी करण्यात आला.

यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये जैनबी यांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करताना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली. ही मतदान प्रक्रिया नागेश बी. तईकर सुक्ष्म निरिक्षक (Micro Observer), टि.टि. झंझाड मतदान केंद्राध्यक्ष, एस.एन. परकवार मतदान अधिकारी, अनिल राऊत पोलीस कर्मचारी, नितेश वाढवे व्हिडिओग्राफर यांच्या उपस्थितीत पार पडली.

Edited By : Siddharth Latkar

1243 voters cast their vote in bhandara gondia lok sabha election 2024
Shirdi Constituency : महायुती, 'मविआ'ने शिर्डी मतदारसंघात डावललं, 'वंचित'कडून अपेक्षा; बौद्ध समाजाचा उमेदवार ठरला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com