- सचिन बनसाेेडे
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. या दाेन्ही आघड्यांनी उमेदवारी देताना बौद्ध समाजाला डावलल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. या नाराजीतून समाजाने मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीने सदाशिव लोखंडे (sadashiv lokhande) आणि आघाडीने भाऊसाहेब वाकचौरे (bhausaheb wakchaure) यांची उमेदवारी घोषित केली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात बहुसंख्य असलेल्या बौद्ध समाजाला डावलल्याने या समाजाने युती आणि आघाडी विरोधात भुमिका घेतली आहे.
या समाजाची आज (गुरुवार) श्रीरामपूर येथे बैठक पार पडली. शिक्षण उपसंचालक राहिलेल्या रामचंद्र जाधव (ramchandra jadhav) यांनी उमेदवारीची तयारी केली आहे. वंचितचे प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांची देखील जाधव यांनी नुकतीच भेट घेतली. वंचित किंवा बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी मिळावी यासाठी सामाज आग्रही आहे. या मतदारसंघात बौद्ध समाजाने निवणुकीत उमेदवार उभा केल्यास शिर्डीची लढाई तिरंगी होणार हे मात्र निश्चित.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.