bharatiya jawan kisan party to contest lok sabha election in 9 constituency
bharatiya jawan kisan party to contest lok sabha election in 9 constituencySaamTV

Maharashtra Lok Sabha Election 2024 : आणखी एक नवा पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; कोल्हापूर, हातकणंगलेसह ९ जागांवर लढवणार निवडणूक

Raghunathdada Patil : राजू शेट्टी यांनी मागील हंगामात ऊस दरासाठी केलेलं आंदोलन निरर्थक ठरलं अशी टीका रघुनाथदादा पाटील यांनी शेट्टींवर केली.

- रणजीत माजगावकर

Raghunathdada Patil News :

भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून कोल्हापूर हातकणंगलेसह नऊ जागांवर लाेकसभा निवडणूक लढविण्याचा (bharatiya jawan kisan party to contest lok sabha election in 9 constituency) निर्धार शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी काेल्हापूरात माध्यमांशी बाेलताना व्यक्त केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (hatkanangale lok sabha constituency) स्वत: रघुनाथदादा पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. यामुळे या मतदारसंघात प्रामुख्याने तिहेरी लढत हाेईल अशी शक्यता आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज (गुरुवार) कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत लाेकसभा निवडणुकीची सुरु असलेल्या तयारी बाबतची माहिती दिली. रघुनाथदादा म्हणाले बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात निवडणुक लढवायला नकार दिला आहे. सामान्य जनता भाजपच्या कारभारावर नाराज यामुळे आम्ही सर्व सामान्यांच्या हितासाठी निवडणुक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी सज्ज झाली आहे.

bharatiya jawan kisan party to contest lok sabha election in 9 constituency
Ratnagiri Sindhudurg Constituency: रत्नागिरी सिंधुदुर्गात किरण सामंतांचे पारडे जड, उमेदवारीवरुन दीपक केसरकर स्पष्टच बाेलले (Video)

रघुनाथदादा म्हणाले भाजपला या निवडणुकीत २०० पार सुद्धा होता येणार नाही. सामान्य जनता भाजपच्या कारभारावर नाराज आहे. दरम्यान राजू शेट्टी यांनी मागील हंगामात ऊस दरासाठी केलेलं आंदोलन निरर्थक ठरलं अशी टीका रघुनाथदादांनी शेट्टींवर केली. दरम्यान बीआरएसने महाराष्ट्रात निवडणूक लढवायला नकार दिल्याचे पाटील यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

bharatiya jawan kisan party to contest lok sabha election in 9 constituency
Gadchiroli–Chimur Lok Sabha Constituency : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 165 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, 85,100 वर्ष वयाच्या आजींही मतदानात आघाडीवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com