Hatkanangale Constituency: हातकणंगले मतदारसंघात पंचरंगी लढतीची शक्यता, माेदींना पंतप्रधान पाहण्यासाठी अपक्ष आमदार निवडणुकीच्या रिंगणात

Hatkanangale Lok Sabha Constituency : हातकणंगले लाेकसभा मतदारसंघात धैर्यशिल माने, राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सत्यजीत पाटील- सरुडकर यांच्यासह आता प्रकाश आवाडे हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.
independent mla prakash awade to contest hatkanangale constituency lok sabha election 2024
independent mla prakash awade to contest hatkanangale constituency lok sabha election 2024saam tv

- रणजीत माजगावकर

Prakash Awade News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना तिस-यांना पंतप्रधान करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरण्याची तयारी काॅंग्रेसचे माजी मंत्री अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी केली आहे. आवाडेंनी साम टीव्हीशी बाेलताना हातकणंगले मतदारसंघातून लाेकसभा (hatkanangale lok sabha constituency) निवडणूक लढविण्यार असल्याचे स्पष्ट केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

हातकणंगले लाेकसभा मतदारसंघात यंदा निवडणुक चूरशीची हाेणार अशी स्थिती सध्या तरी दिसून येत आहे. या मतदारसंघात धैर्यशिल माने, राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सत्यजीत पाटील- सरुडकर यांच्यासह आता प्रकाश आवाडे हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. यामुळे या मतदारसंघात पंचरंगी लढत हाेण्याची शक्यता आहे.

independent mla prakash awade to contest hatkanangale constituency lok sabha election 2024
Tuljapur : तुळजाभवानीचे 207 किलो सोने, 2570 किलो चांदी वितळवण्याचा निर्णय; शिर्डी व सिध्दिविनायक मंदीर प्रमाणे प्रक्रिया

अपक्ष आमदार प्रकाश आवाडे साम टीव्हीशी बोलताना म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे. मी जरी महायुतीकडून उमेदवार नसलो तरी जनतेच्या आग्रहास्तव हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेच्या विश्वासामुळं 2024 चा खासदार मीच होणार असेही आवाडे यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

independent mla prakash awade to contest hatkanangale constituency lok sabha election 2024
Sangli Constituency: सांगलीत ट्विस्ट... 'स्वाभिमानी'चा उमेदवार जाहीर, काॅंग्रेसच्या गाेटात चिंता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com