Kalashtami 2026: यंदाच्या कालाष्टमीला 'शिव योगा'सोबत बनणार दुर्मिळ योग; पाहा कधी आहे शुभ मुहूर्त

Rare Shivvas Yoga significance on Kalashtami: ११ मार्च रोजी मासिक कालाष्टमी साजरी होणार आहे. या दिवशी दुर्मिळ शिववास योग आणि सिद्धी योग निर्माण होत असून कालभैरव पूजेचा विशेष शुभ मुहूर्त आहे.
Rare Shivvas Yoga significance on Kalashtami
Rare Shivvas Yoga significance on Kalashtamisaam tv
Published On

वैदिक कॅलेंडरनुसार, ११ मार्चला मासिक कालष्टमी आहे. हा सण दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवाचं उग्र रूप असलेल्या कालभैरव देवाची पूजा केली जाते. आपल्या कामामध्ये यश मिळावं म्हणून उपवास देखील केला जातो. तांत्रिक साधक कालष्टमीला कालभैरव देवासाठी कठोर साधना करतात.

ज्योतिषांच्या मते, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला दुर्मिळ शिववास योग निर्माण होत आहे. यासोबतच इतर अनेक शुभ योगही निर्माण होतायत. या योगांमध्ये काल भैरव देवाची पूजा केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते असं मानलं जातं. चला यावेळीचा शुभ मुहूर्त आणि योग जाणून घेऊया.

Rare Shivvas Yoga significance on Kalashtami
Pandharpur : चंद्रग्रहणानंतर विठूरायाला चंद्रभागा पाण्याने स्नान | VIDEO

कालाष्टमी शुभ मुहूर्त (Kalashtami Shubh Muhurat)

वैदिक कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी ११ मार्च रोजी पहाटे १:५४ वाजता सुरू होणार आहे. तर १२ मार्च रोजी पहाटे ४:१९ वाजता संपणार आहे. कालष्टमीच्या दिवशी रात्रीच्या वेळी कालभैरवाची पूजा केली जाते. या रात्रीचा शुभ मुहूर्त रात्री ११:३५ ते १२:२३ आहे.

शिववास योग

ज्योतिषांच्या मते, चैत्र महिन्याच्या कालाष्टमीला एक दुर्मिळ शिववास योग तयार होतोय. ११ मार्च रोजी पहाटे ०१:५४ वाजता हा शुभ योग तयार होत असून त्यावेळी शिववास योग १२ मार्च रोजी पहाटे ०४:१९ वाजता समाप्त होणार आहे.

शिववास योगात कालभैरव देवाची पूजा केल्याने दुप्पट फळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे सर्व बिघडलेली कामं पूर्ण होणार आहेत. सिद्धी योगाचाही संयोग कालष्टमीला तयार होणार आहे. या योगात कालभैरव देवाची पूजा केल्याने भक्ताला शुभ कार्यात यश मिळतं.

Rare Shivvas Yoga significance on Kalashtami
Chandra Grahan: शनीच्या राशीत लागणार वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण; जाणून घ्या सूतक काळ आणि नियम

पंचांग

  • सूर्योदय - सकाळी ०६:०३ वाजता

  • सूर्यास्त - संध्याकाळी ५:५६

  • ब्रह्म मुहूर्त - पहाटे ०४:२६ ते ०५:१५ पर्यंत

  • विजय मुहूर्त - दुपारी 01:58 ते 02:46 पर्यंत

  • संधिप्रकाश वेळ - संध्याकाळी ५:५४ ते ६:१८ पर्यंत

Rare Shivvas Yoga significance on Kalashtami
Chandra Grahan 2026: चंद्र ग्रहण संपल्यानंतर करा ही कामं; नकारात्मक उर्जा होऊ शकते दूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com