Manisha Koirala Saam Tv
मनोरंजन बातम्या

Manisha Koirala : "सर्वच स्वप्ने पूर्ण होत नाहीत…"; मनीषा कोईरालाने मूल दत्तक न घेण्याचं सांगितलं कारण

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला (Manisha Koirala) सध्या 'हीरामंडी' वेबसीरिजमुळे (Heeramandi Web Series) चर्चेत आहे. २०१२ मध्ये मनीषा कोईरालाला कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर मनीषाने २०१७ मध्ये रिलीज झालेल्या 'डियर माया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे. तर आता 'हीरामंडी' या वेबसीरिजनंतर अभिनेत्रीने ओटीटी विश्वात दमदार कमबॅक केले आहे. नुकतंच एका मुलाखतीत मनीषाने मातृत्वाचा अनुभव न मिळाल्याचं दु:ख व्यक्त केलं. सोबतच अभिनेत्रीने आजपर्यंत मूल दत्तक का नाही घेतलं यामागील कारणही तिने सांगितलं आहे.

५३ वर्षीय मनीषा कोईरालाने मुलाखतीत सांगितले की, "कॅन्सरनंतर मला खूप संघर्ष करावा लागला. माझ्या आयुष्यात काहीतरी अपूर्ण आहे. जसजसे तुम्ही मोठे व्हाल तसतसे तुम्ही तुमचे सत्य स्वीकारता. आपली सगळीच स्वप्न पूर्ण होत नाहीत. अशी अनेक स्वप्नं असतात जी आपल्याला केव्हाच पूर्ण होणार नाहीत याची जाणीव होते. आपल्याला त्यासोबत तडजोड करावं लागेल. आई होणे ही गोष्टही माझ्यासाठी त्यापैकीच एक आहे. गर्भाशयाचा कर्करोग आणि आई होऊ न शकणे हे खूप कठीण होते. पण मी आता ही गोष्ट स्वीकारली आहे."

मनीषा कोईरालाला मूल दत्तक घेण्याबद्दलही प्रश्न विचारला होता. यावर ती म्हणाली, "मूल दत्तक घेण्याविषयी मी फार विचार केला. पण मी त्या गोष्टीचा विचार केली की मला खूप टेन्शन येतं. मला अस्वस्थ वाटू लागते. त्यामुळे मी त्या गोष्टीचा विचार सोडला आणि वाटलं गॉडमदर होणं जास्त चांगलं आहे. माझे वृद्ध आई-वडील आहेत, त्यांच्यावर मी खूप प्रेम करते. मी आता अनेकदा काठमांडूला जाते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवते आणि त्यामुळे मला आनंद होतो."

सध्या मनीषा कोईराला 'हिरामंडी' वेबसीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'हिरामंडी' वेबसीरीज रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक केले आहे. "कॅन्सरनंतर मला नवीन जीवन मिळाले आहे." अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली आहे. मनीषा कोईरालाने गर्भाशयाच्या कर्करोगाशी लढा दिला आहे. २०१२ मध्ये तिला कॅन्सरचे निदान झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT