Viral Video: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये विदेशी महिलेसोबत असभ्य वर्तन, बाथरूमपर्यंत पाठलाग अन्....

Viral video train india: भारतातील ट्रेन प्रवासादरम्यान एका विदेशी महिला पर्यटकाला काही तरुणांनी त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral video train india
Viral video train indiaSAAM T
Published On

भारतामधील ट्रेन प्रवासादरम्यान एका विदेशी महिला पर्यटकाला आलेल्या भयानक अनुभवाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पोर्तुगालमधील सोलो ट्रॅव्हलर इनेस फारिया हिने हा व्हिडिओ शेअर करत तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, जोधपूरहून प्रवास करताना 3AC कोचमध्ये काही तरुणांनी तिला त्रास दिला. इतकंच नाही तर तिचा बाथरूमपर्यंत पाठलागही केला.

नेमकं काय घडलंय?

इनेस फारिया तिच्या मैत्रिणीसोबत जोधपूरहून ट्रेनने प्रवास करत होती. तिच्या समोरच्या सीटवर बसलेले काही तरुण सतत तिच्याकडे पाहत असल्याचं तिने स्वतः शूट केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलंय. ती म्हणते, 'सुरुवातीला मला अस्वस्थ वाटत होतं, पण जेव्हा ती मुलं फक्त मला बघण्यासाठी वारंवार त्यांची सीट बदलू लागले. तेव्हा मला जास्तच भीती वाटू लागली.'

Viral video train india
Railway Accident CCTV : धावत्या ट्रेनमध्ये चढायला गेली, तोल गेला; काळ बनून आलेल्या मृत्यूला चकवलं...

फारियाने पुढे सांगितले की, त्या तरुणांच्या जवळून जाणं टाळण्यासाठी ती दुसऱ्या कोचमधील वॉशरूममध्ये गेली. मात्र काही सेकंदांतच एक तरुण तिच्या मागे बाथरूमपर्यंत आला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. 'तो माझ्या मागेच बाथरूमपर्यंत आला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी मी खूप घाबरले होते,' असं फारियाने व्हिडिओमध्ये म्हटलंय.

फारियाच्या मैत्रिणीने त्या तरुणाला तिचा पाठलाग करताना पाहिलं आणि ती लगेच तिथे पोहोचली. त्यानंतर दोघींनी लगेच टीसीला या घटनेची माहिती दिली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही महिलांना 2AC कोचमध्ये हलवलं. त्यानंतर त्यांना कोणताही त्रास झाला नसल्याचं सांगितलंय. आपल्या व्हिडिओमध्ये तिने मदत केल्याबद्दल रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभारही मानले आहेत.

Viral video train india
Viral Video: आई की वैरीण! रिल्ससाठी चिमुकल्याला खोल विहिरीतच लटकवल; VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सने याबाबत संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीये. काही भारतीय महिलांनी कमेंट करत सांगितलं की, त्यांनाही सार्वजनिक ठिकाणी अशाच प्रकारच्या घटनांचा अनुभव आहे.

इनेस फारियासोबत अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मुंबईतील धोबी घाट परिसरातही दोन तरुणांनी सेल्फीसाठी तिचा जवळपास 15 मिनिटं पाठलाग केला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी संबंधित तरुणांना अटक केली होती.

Viral video train india
Train viral video: थरारक! ट्रेन पकडण्यासाठी महिलेने जीव धोक्यात घातला, रेल्वे स्टेशनवरील धडकी भरवणारा VIDEO

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com