Train viral video: थरारक! ट्रेन पकडण्यासाठी महिलेने जीव धोक्यात घातला, रेल्वे स्टेशनवरील धडकी भरवणारा VIDEO

Agra railway station shocking viral clip: उत्तर प्रदेशातील आग्रा कॅन्ट रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन पकडताना महिलेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोनदा घसरूनही तिने तिसऱ्या प्रयत्नात ट्रेन पकडली.
Agra railway station shocking viral clip
Agra railway station shocking viral clipsaam tv
Published On

उत्तर प्रदेशातील आग्रा कॅन्ट रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. पाणी घेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या एका महिलेने गाडी सुटत असतानाच ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. तिचा मुलगा ट्रेनमध्ये एकटा असल्याने तिने घाईघाईत ट्रेन पकडली. यावेळी दोनदा घसरून देखील ती तिसऱ्या प्रयत्नात चालत्या ट्रेनमध्ये चढली. मात्र हा व्हिडीओ पाहताना तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला प्लॅटफॉर्मवरून धावत ट्रेनच्या हँडलला पकडण्याचा प्रयत्न करते. पहिल्यांदा तिचा पाय घसरतो आणि ती जोरात पडते. मात्र तरीही ती उठून पुन्हा चढण्याचा प्रयत्न करते. यावेळी हँडल हातातून निसटल्याने ती प्लॅटफॉर्मवर घासत जाते.

Agra railway station shocking viral clip
Viral Video: 15 मिनिटं पाठलाग, जवळीच साधण्याचा प्रयत्न...! मुंबईत विदेशी महिलेसोबत गैरकृत्य, सोशल मीडियावर संताप

असं असूनही ती हार न मानता तिसऱ्यांदा धाव घेत थेट ट्रेनमध्ये चढते. हा संपूर्ण प्रकार काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होताना दिसतोय. यामध्ये सुदैवाने ती महिला ट्रेनच्या खालील बाजूला पडली नाही.

या घटनेमध्ये प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेली गर्दी केवळ तिच्याकडे पाहत होते. व्हिडीओत काहीजण हा प्रकार शूट करत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र कोणीही चेन ओढण्याचा किंवा महिलेच्या मदतीला धावण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Agra railway station shocking viral clip
Leopard Viral Video: पोलीस ठाण्यात बिबट्या घुसला; सगळ्या खोल्यांची घेतली झडती, पोलीस कर्मचाऱ्याला भरली धडकी

सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया

एका युजरने लिहिलंय की, 'लोकांनी मदत करण्याऐवजी व्हिडीओ काढणं पसंत केलं, ही चिंताजनक बाब आहे.' तर दुसऱ्याने म्हटलंय की, 'मायेपोटी तिने जीवाची बाजी लावली.'

रेल्वे प्रशासनाकडून दखल

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांनी प्रवाशांना स्पष्ट इशारा दिलाय की, कोणत्याही परिस्थितीत चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करू नये. जर सामान किंवा नातेवाईक ट्रेनमध्ये राहिले असतील तर तात्काळ स्टेशन मास्टर किंवा रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधावा.

Agra railway station shocking viral clip
Viral Video: बिबट्यालाही नाही सोडलं...; बिबट्याला रंग लावतानाचा व्हिडीओ व्हायरल, युजर्स पडले संभ्रमात

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com