Railway Accident CCTV : धावत्या ट्रेनमध्ये चढायला गेली, तोल गेला; काळ बनून आलेल्या मृत्यूला चकवलं...

Railway Accident Viral Video: सोशल मीडियावर आपण अनेक अपघांताचे थरारक व्हिडिओ पाहत असतो. मुंबईतून असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.
Railway Accident CCTV
Railway Accident CCTV Saam Digital
Published On

Railway accident video viral

काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या म्हणीची प्रचिती मुबंईतील एका रेल्वे स्थानकात आली. या रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या नादात तरुणीचा तोल गेला. सुदैवाने ट्रेनमध्ये दरवाजात असलेल्या एका प्रवाशानं या तरुणीला प्रसंगावधान राखून फलाटावर सरकवले. त्यानंतर तिथंच तैनात असलेल्या रेल्वेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिला बाहेर ओढून तिचा जीव वाचवला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Railway Accident CCTV
Fight Viral Video: बाबो....!गोल गोल फिरवत एकमेकींना धू धू-धुतल; प्रेमासाठी तरुणी भिडल्या ; VIDEO व्हायरल

पश्चिम रेल्वेने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर केले आहे. रेल्वे स्थानकात ट्रेनने प्रवेश केला. ती थांबण्याच्या आधीच प्रवासी तरूणीने चढण्याचा प्रयत्न केला. त्या नादात तिचा तोल गेला. ती खाली पडली. ट्रेन आणि फलाटाच्या मध्ये ती जाणार तेवढ्यात दरवाजात उभ्या असलेल्या एका प्रवाशानं प्रसंगावधान राखून तरुणीला फलाटावर ढकललं. तिथंच महिला पोलीस तैनात होती. तिनं या तरुणीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. तिला फलाटावर ओढून घेतलं आणि तिचा जीव वाचवला. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रेल्वे प्रशासनानंही या पोलीस महिलेचं कौतुक केलं आहे.

अती घाई, संकटात नेई या म्हणीचा प्रत्यय हा व्हिडिओ बघून येतो. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार उद्घोषणा करून यासंदर्भात जागृती करण्यात येते. मात्र, अनेक रेल्वे प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात आणि जीव धोक्यात घालतात.

व्हिडिओ बघून काळजाचा ठोका चुकेल

पश्चिम रेल्वेने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @WesternRly या अकाउंटवरून पोस्ट केला आहे. तो प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना पश्चिम रेल्वेवरील एका रेल्वे स्थानकातील आहे. नेमकी ही घटना कोणत्या स्थानकातील आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. रेल्वेने तरुणीचा जीव वाचवणाऱ्या रेल्वे पोलीस महिलेचे कौतुक केले आहे. महिला पोलिसानं प्रसंगावधान राखून फक्त जीवच वाचवला नाही, तर एक चांगला मेसेज दिला आहे. धावत्या ट्रेनमध्ये चढू किंवा उतरू नका, असा संदेश या पोस्टमधून देण्यात आला आहे.

धाडसी पोलीस महिलेवर कौतुकाचा वर्षाव

हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी रेल्वेच्या पोलीस महिलेचं कौतुक केलं आहे. प्रवासी तरुणीचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी अधिकारी महिलेला सलाम अशा कमेंट नेटकरी करत आहेत.

Railway Accident CCTV
Viral Video: शाब्बास पठ्ठ्यानो! चिमुकल्यांची इंग्लिश ऐकून तुम्हीदेखील अवाक व्हाल; VIDEO एकदा पहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com