Viral Video: आई की वैरीण! रिल्ससाठी चिमुकल्याला खोल विहिरीतच लटकवल; VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

Shocking Video: रिल्ससाठी आईनेच आपल्याच चिमुकल्याचा जीव धोक्यात घातलेला आहे. सध्या सर्वत्र तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Shocking Video
Viral VideoSaam Tv
Published On

प्रत्येक आईसाठी तिची मुलं अत्यंत महत्त्वाची असतात. मुलांसाठी आई अख्या जगाशी लढायला तयार असते. मुलं मोठ झालं तरी आई मुलांची काळजी करणं सोडत नाही. मुलं लहान असताना त्यांना जराही दुखापत झाल्यास आईच्या काळजाचे पाणी होते. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यात आईनेच एक रील बनवण्यासाठी आपल्याच चिमुकल्याचा जीव धोक्यात घातलेला आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आई (mother) आणि तिच्या लहान चिमुकल्यासोबत असतात. अनेक व्हिडिओ हे अतिशय गोंडस आणि सुंदर असतात. मात्र सध्या व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ संतापजनक आहे. ज्यात रिल्स बनवण्यासाठी महिलेने हद्दच पर केलेली आहे. नक्की काय आहे व्हिडिओ ते तुम्ही पुढील बातमीमध्ये पाहा.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत एक महिला एका विहीरीच्या वर बसलेली आहे. संपूर्ण परिसर शेतशिवारातील दिसत आहे. व्हिडिओतील महिला विहीरीच्यावर बसून हिंदी गाण्यावर रील बनवत आहे. मात्र रील बनवताना तिने हद्द पार केलेली आहे. महिलेने थेट रील प्रसिद्ध (famous) होण्यासाठी तिच्या चिमुकल्याला विहीरीच्या आत धरलेले आहे. तिचा एक पाय खोलगट विहीरीच्या आत आहे त्यात पायाला धरुन एक चिमुकला लोबकळत आहे. महिलेचा रील तिथे असलेला एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रिकॉर्ड (Record) केलेला आहे.

व्हायरल रील (Reel) व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्स इन्स्टाग्रामवरील ''@nasreendance991'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. या अकाउटवर याच महिलेचे अनेक व्हिडिओ आहे ज्यात तिने अनेक गाण्यावर रिल्स (Reels) बनवले आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ १ सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आलेला असून आतापर्यंत व्हिडिओवर ४ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर अनेक व्ह्यूज व्हिडिओवर येत आहेत.

प्रतिक्रिया

या महिलेचा व्हिडिओ (Video) व्हायरल होताच सर्वांच्या चर्चेचा विषय बनलेला आहे. त्यानंतर अनेक यूजर्संनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' ''व्हिडिओमुळे वेडी बाई मुलांना पडेल खाली'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''व्हिडिओच्या निमित्तानं मुर्ख मुलीला मारणार का?'' प्रत्येक व्यक्तीने संतापजनक (Infuriating) प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये लिहिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Video
Viral Video: चाललंय तरी काय? बिकानेरच्या समोस्यामध्ये आढळला बेडकाचा पाय, व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल किळस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com