रील्स बनवणे आता प्रत्येक व्यक्तीच्या अगांशी येत आहे. दररोज एक तरी व्हायरल व्हिडिओ रीलमध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींचे असतात. कुठे रिल्स बनवता रेल्वेची धडक तर कुठे रिल्स बनवताना पाय घसरुन दरीत पडणे, अशा अनेक घटना दररोज समोर येत आहेत. मात्र तरीही धोकादायक ठिकाणी रिल्स बनवणे तरुणाईला सुटले नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका रिल्स बनवणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात रील बनवाता पाण्यात पडून जीव बचावला गेला आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून धबधब्यावर तर कधी नदीकाठी (Riverside) अनेक तरुणापासून ते अनेकांनी रील बनवले आहेत. हे रील बनवताना अनेकांना त्यांच्या कुटुंबासह जीव गमवावा लागलाय. तरीही रिल्स बनवून ते सोशल मीडियावर पोस्ट करणं आणि अनेक लाईक्स मिळवण, हे तरुणाला लागलेले नुकसानदायर वेड आहे. मात्र तरीही स्वता:चा जीव धोक्यात घालून रिल्स बनवणे थांबले नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणीचा व्हिडिओही असाच आहे. ज्यात रिल्स (Reels) बनवणे तिला चांगलच महागात पडलेले आहे.
व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ गंगा घाटावरील असल्याचे दिसून येत आहे. पुढे व्हिडिओ रील बनवताना तरुणी गंगा घाटावरील किनाऱ्यावरुन तिथे असलेल्या शिवलिंगासमोर येते. तरुणीच्या बाजूला पाण्याचा प्रवाह अतिशय जोरदार आहे. मात्र रील (Reel) बनवण्यासाठी तरुणी शिवलिंगासमोर हात जोडून रडण्याचा अभिनय करते, त्यातची अभिनय करत तिथे असलेल्या एका पाईपवरुन पाण्यात उडी मारण्याचा अभिनय (Acting) करण्यासाठी जाते. मात्र ज्या शनी ती पाईपवरुन चढून दोन पाऊल चालते, तेव्हाच तिच्या पाय घसरुन ती जोरात पाईपवर आधळून वाहत्या पाण्याच्या प्रवाहात पडते. तशीच पुढे ती वाहत जाते आणि नशीबाने एका पाईपला पकडून स्वता:चा जीव वाचवते.
गंगा घाटवरील तरुणीचा व्हायरल (Viral) व्हिडिओ अनेक शहरातील नेटकऱ्यांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहताच एक्सवरील व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे की,''यांच्यामुळे आपली संस्कृती बिघडत आहे'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''काय गरज असते यांना'' तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे,' २ मिनिटत सर्व काही संपल असत'' अशा प्रकारे अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया कमेंट (Comments) बॉक्समध्ये दिलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.