Stunt Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video : भयंकर! नदीकाठी स्टंट करणं अगंलट; उडी मारताना तरुणाचा तोल गेला अन्...पाहा थरारक VIDEO

Stunt Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात कधी अपघांताचे व्हिडिओ असतात तर कधी गंमतशीर. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
Published on

सोशल मीडिया कमी वेळाच लाखो नागरिकांपर्यंत पोहचण्याचे वेगवान माध्यम आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी सध्याची तरुणाई काय करेल आपल्याला काही सांगता येणार नाही. सध्या अनेकजण धोकादायक स्टंट करुन त्याचे व्हिडिओ बनवतात. सोशल मीडियावर याआधीही अनेक धोकादायक स्टंटचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असणार.अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात स्टंट करण्याच्या नादात तरुणाची मान तुटली असती.सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा होतेय.

Stunt Viral Video
Virat Kohli Viral Video: लाईव्ह सामन्यात राडा! श्रीलंकन गोलंदाजाकडून विराटला शिवीगाळ? पाहा VIDEO

नक्की काय आहे व्हिडिओत?

व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओ एका नदीच्या परिसरातील दिसत आहे.या नदी काठी दोन तरुण आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीस एक तरुण पळत येतो आणि उलटी उडी मारण्याचा प्रयत्न करणार असतो,मात्र...योग्य वेळ आणि योग्य गतीचा अंदाज चुकल्याने स्टंट करणारा तरुण थेट मानेवर जमिनीवर आपटतो. जसा स्टंट करणारा तरुण जमिनीवर पडतो तसा दुसरा तरुण त्याला उचलतो. सध्या स्टंट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला स्टंट(Stunt) व्हिडिओ@faruk_islamic_channelया अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच हजारोंमध्ये लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत शिवाय व्हिडिओ नेटकऱ्यांनी पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया व्हिडिओला मिळाल्या आहेत.

जूने स्टंट व्हिडिओ कोणते?

सोशल मीडियावर अनेक स्टंट व्हिडिओ व्हायरल(Viral) झाले होते. त्यात पुणे शहराती उंच इमारतीवरुन लटकून तरुणींचा स्टंट व्हिडिओ होता तर कधी धावत्या बाईकवर उभे राहून केलेला स्टंट असेल. अनेकदा स्टंट करण्याच्या नादात काही व्यक्तींना जीवही गमवावा लागला आहे. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या स्टंट व्हिडिओवर अनेक यूजर्संनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.त्यातील अनेक नेटकऱ्यांनी कमेट्स केली आहे की,'कोणी सांगितलं असं करायला'तर असंचं होत परिपूर्ण माहिती नसल्यास'.

Stunt Viral Video
Viral Video : नादच खुळा! हलगीच्या तालावर आजी आजोबांनी धरला ठेका; उत्साह पाहून तुम्हीही म्हणाल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com