CCTV Footage: धावती ट्रेन पकडताना तरुणीचा गेला तोल अन् पुढे...थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद; पहा VIDEO

Madhya Pradesh News: रेल्वे स्टेशनवरील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आता हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
CCTV Footage
CCTV Footagesaam digital
Published On

Madan Mahal railway Cctv Footage

आजवर अनेक व्यक्तींनी धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात आपले प्राण गमावले आहेत. रेल्वेने प्रवास करताना किंवा रेल्वे स्टेशनवर आपल्याला सुचना ऐकायला मिळत असतात तरीही धावती ट्रेन पकडण्याचे साहज अनेक व्यक्ती करतात. त्यात पुन्हा धावती ट्रेन पकडण्याच्या नादात तरुणी ट्रेनखाली गेली आहे. या अपघातात तरुणी थोडक्यात बचावली गेली असून तिच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. रेल्वे स्टेशनवरील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आता हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल झालेली घटना मध्य प्रदेशातील जबलपूरमधील मदन महल या रेल्वे स्टेशनमधील आहे. काजल दुबे असे या तरुणीचे नाव असून ती कटनी जिल्ह्यातील असून काही कामानिमित्त भोपाळला जात होती तसेच जबलपूर रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी ५.३० च्या दरम्यान संबंधित घटना घडली असून तरुणी भरधाव वेगात निघालेली श्रीधाम एक्सप्रेस पकडत होती. मात्र पोहचण्यास उशिर झाला आणि ट्रेन सुटली. यानंतर ट्रेन पकडू शकतो या कारणास्तव तरुणी ट्रेन मागे धावली.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेशन असणारी ट्रेन तिच्या वेळेनुसार प्लॅटफॉर्मवरुन निघत होती तेवढ्याच स्टेशनवर ही तरुणी येते आणि स्टेशनवरुन निघालेली धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असते. तेव्हाच ती धावत्या ट्रेनच्या एका कोचमध्ये चढण्याच्या प्रयत्न करते मात्र ती घसरुण प्लॅटफॉर्मवरुन खाली पडते. या घटनेनंतर तरुणीला तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजले जाते.

ही थरारक घटना रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. अपघाताचा हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @HateDetectors या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com