ट्रेन प्रवास सध्या जोखमीचा झालेला आपल्याला दिसतो. कधी धावती ट्रेन पकडण्याच्या नादात काही व्यक्ती ट्रेनच्या खाली जातात आणि स्वत:चा जीव गमवात तर कधी ट्रेनमधून उतरताना ट्रेनच्या आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या गॅपमध्ये पडून काही व्यक्तींचा जीव गेला आहे.(Viral Video)
अनेक वेळा स्वत:च्या निष्काळजीपणामुळे अनेक व्यक्तीचा जीव जातो तर बऱ्याचवेळा इतरांच्या चुकीमुळे अनेक अपघात होतात.अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात काही मुलांच्या मस्तीमुळे एक तरुणी ट्रेनच्या आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये असलेल्या गॅपमध्ये पडलेली आहे.व्हिडिओ पाहून तुमच्या अगांवर काटा येईल.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
देशातील कोणताही जिल्ह्या असो वा शहर तरुणींना झेडा-झेडीच्या घटना काही थांबायच नाव घेत नाही. अनेक सार्वजनिक ठिकाणी ही अशा बऱ्याच घटना आपल्याला पाहायला मिळत असतात. अशा झालेल्या घटनांमुळे तरुणीच्या मनात कायम भितीचे वातावरण असते.काही घटना या सीसीटीव्हीमध्ये कैद होतात आणि प्रसार माध्यमात व्हायरल होतात त्यातच सध्या या तरुणीच्या घटनेचा व्हिडिओ स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या सीसीटीव्हीचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
व्हायरल झालेला व्हिडिओ बाहेरील देशातील आहे हे आपल्याला व्हिडिओ पाहून समजते परंतू नक्की कोणत्या शहरातील स्टेशनचा आहे हे समजू शकलेले नाही. मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील@PicturesFoIderया एक्स अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.एक्स प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. प्रत्येक यूजरने लिहिले आहे की,' त्या तरुणांवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी'.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहू शकता की, काही तरुण ट्रेनमधून सायकल घेऊन उतरले आहेत. स्टेशन प्लॅटफॉर्म काही तरुणी ट्रेन पकडण्यासाठी पळत आहेत मात्र सायकल घेऊन उतरलेले दोन तरुण त्या तरुणीला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर एक तरुणी तिथे ट्रेन पकडण्यासाठी पळत येते मात्र त्या दोन तरुणांपैकी पुढे असलेला तरुण तिला धक्का मारण्याचा प्रयत्न करतो.
तर त्याच्या पाठी सायकल घेऊन असणारा तरुण तिला सायकलचा धक्का मारतो. या सायकलच्या धक्काने ती तरुणी ट्रेन आणि रेल्वे प्लॅटफॉर्मच्यामध्ये असलेल्या गॅपमध्ये पडते. तरुणी पडल्यानंतर दोघेही तरुण तिथून पळ काढतात. मात्र तरुणीला किती दुखापत झाली हे कळू शकलेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.