Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेन आता परदेशातही धावणार; रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितला प्लान

Vande Bharat Railway News: वंदे भारत ट्रेनला देशात खूप जास्त प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता परदेशातही वंदे भारत ट्रेन धावणार आहे. परदेशात या ट्रेन निर्यात करणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
Vande Bharat Train
Vande Bharat Train Saam TV
Published On

Vande Bharat Railway Now Export In Other Countries:

वंदे भारत ही देशातील सर्वात सुसाट धावणारी ट्रेन आहे. वंदे भारत ट्रेनला भारतात प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच आता ट्रेनबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही वर्षांत वंदे भारत ट्रेनची निर्यात केली जाणार आहे, ही घोषणा केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. म्हणजेच भारतानंतर आता परदेशातही वंदे भारत ट्रेन धावणार आहे. (Latest News)

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ग्लोबल बिझनेस सबमिटमध्ये ही माहिती दिली आहे. यावेळी रेल्वेमंत्री यांनी सांगितले की, आपल्याच इंजिनियर्सच्या मदतीने देशात वंदे भारत ट्रेन तयार करणे हे खूप मोठे आव्हान होते. यामध्ये देशाला यश मिळाले आहे. आता येत्या काही वर्षात आम्ही या ट्रेनची निर्यातदेखील सुरु करु असा आत्मविश्वास आहे.

वंदे भारत ट्रेनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या या ट्रेनमध्ये आणखी काही सुधारणा केल्या जात आहेत. वंदे भारत स्लीपर कोच या नवीन प्रकारावर काम सुरु आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

Vande Bharat Train
Qatar Releases Navy Veterans : कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या ८ माजी नौसैनिकांची सुटका, ७ जण भारतात परतले

वंदे भारत ट्रेनची संख्या आता ८२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. नवी दिल्ली-मुंबई आणि नवी दिल्ली- हावडा रेल्वे मार्गावर ट्रेनचा वेग ताशी १६० किमी वाढवण्याचे काम सुरु आहे. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत देशात ८२ वंदे भारत रेल्वे सुरु होतील, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. वंदे भारत ट्रेनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे या ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर या ट्रेनची निर्यात परदेशातही केली जाणार आहे.

Vande Bharat Train
Bihar Road Accident: बिहारमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; २ मृत्यूमुखी तर इतर प्रवासी जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com