Vande Bharat Train: भाविकांसाठी खुशखबर! लवकरच शेगावसाठी धावणार ‘वंदे भारत ट्रेन’, पाहा कसा असेल मार्ग?

Shegaon Vande Bharat Train: लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव मार्गावर दोन वंदे भारत ट्रेन्स सुरू होणार आहे. त्यासंदर्भातील अधिसूचनेचा प्रस्तावही मध्य रेल्वेकडून मागवण्यात आल्याची माहिती आहे.
Shegaon Vande Bharat Express
Shegaon Vande Bharat ExpressSaam tv

Vande Bharat Express to Shegaon

गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता शेगावचा प्रवास सुखकर आणि जलद होणार आहे. कारण, लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव मार्गावर दोन वंदे भारत ट्रेन्स सुरू होणार आहे. त्यासंदर्भातील अधिसूचनेचा प्रस्तावही मध्य रेल्वेकडून मागवण्यात आल्याची माहिती आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shegaon Vande Bharat Express
Beed To Ayodhya Bus: रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, ST महामंडळाची बीड ते अयोध्या बससेवा सुरू, तिकीटदर किती?

विदर्भाची पंढरी म्हणून संत गजानन महाराज यांचे श्रीक्षेत्र शेगावची ओळख आहे. देशभरातून दररोज हजारो भाविक शेगावला जाऊन गजानन महाराजांच्या चरणांचं दर्शन घेतात. मात्र, प्रवासासाठी त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. (Latest Marathi News)

हीच बाब लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने शेगावसाठी दोन वंदे भारत टेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबईहून शेगाव आणि पुण्याहून शेगावसाठी वंदे भारत ट्रेन्स (Vande Bharat Train) धावणार आहेत.

मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सध्या रेल्वे मंत्रालय मे २०२४ पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या ३० ते ३५ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे.

यामध्ये गजानन महाराज यांचे श्रीक्षेत्र शेगावचा देखील समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, मध्य रेल्वेमार्गावर जळगाव व भुसावळ ही महत्त्वाची जंक्शन स्थानके आहेत. या स्थानकांवरुन शेगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ‘वंद भारत ट्रेन’ला या दोन्ही स्थानकांवर थांबा मिळण्याचीही शक्यता आहे.

Shegaon Vande Bharat Express
Breaking News: छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा, भाजप-मविआ कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांकडून धरपकड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com