Beed To Ayodhya Bus: रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, ST महामंडळाची बीड ते अयोध्या बससेवा सुरू, तिकीटदर किती?

Beed To Ayodhya ST Bus: रामभक्तांसाठी आनंदाची बातमी आता बीडहून एसटी बसने थेट अयोध्या, प्रयागराज आणि काशीला जाता येणार आहे.
Beed To Ayodhya MSRTC Bus
Beed To Ayodhya MSRTC Bus Saam TV
Published On

Beed To Ayodhya MSRTC Bus

गेल्या अनेक वर्षांपासून प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची ओढ धरून बसलेल्या बीड जिल्ह्यातील भाविकांसाठी आता एसटी महामंडळाने खुशखबर दिली आहे. अयोध्यातील भाविकांची वाढती संख्या पाहून, राज्य परिवहन महामंडळाने 'अयोध्या दर्शन' यात्रेचे आयोजन केले आहे. यामुळे आता भाविकांना बीडहून एसटी बसने थेट अयोध्या, प्रयागराज आणि काशीला जाता येणार आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed To Ayodhya MSRTC Bus
Raigad Lok Sabha: रायगड लोकसभा मतदारसंघावर पुन्हा भाजपचा दावा; सुनील तटकरे की धैर्यशील पाटील, कुणाला मिळणार तिकीट?

विशेष म्हणजे अयोध्येपासून (Ayodhya) काशी, प्रयागराज ही देवस्थानेदेखील जवळच आहेत. तसेच या देवस्थानाविषयी भाविकांची देखील आस्था आहे. यामुळे एकाच प्रवासात भाविकांना तीन देवस्थानांचे दर्शन करता येणार आहे.  (Latest Marathi News)

या तिन्ही दर्शनासाठी भाविकांना साध्या बससाठी 5 हजार 100, आसन शयनयानसाठी 6 हजार 900 तर शयनयान बससाठी 7 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर आसन क्षमतेनुसार एकत्रित प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यास मागणीनुसार बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रवासासाठी सुसज्ज आणि नवीन बस वापरण्यात येणार असल्याचे विभागीय कार्यालयाने सांगितले. यामुळे भाविकांना आता 5 हजार रुपयांपासून देवदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, उद्या मंगळवारपासून बीडहून तीनही प्रकारातील बस भाविकांच्या मागणीनुसार अयोध्येच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत.

तसेच आगामी काळात भाविकांच्या प्रतिसादावर बस कायम ठेवायचा निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, काशी, प्रयागराज, अयोध्या किंवा उत्तर प्रदेशसारख्या राज्यात पहिल्यांदाच लालपरी पाठवण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाकडून घेण्यात येत असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

Beed To Ayodhya MSRTC Bus
Crime News: भररस्त्यातून २२ वर्षीय तरुणीचे अपहरण, जबरदस्ती दारू पाजत धावत्या कारमध्ये अत्याचार; चौघांवर गुन्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com