Raigad Lok Sabha: रायगड लोकसभा मतदारसंघावर पुन्हा भाजपचा दावा; सुनील तटकरे की धैर्यशील पाटील, कुणाला मिळणार तिकीट?

Maharashtra Political News: रायगड लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपने दावा सांगितला असून ही जागा आपल्याच मिळावी असा सूर कार्यकर्त्यांनी लावला आहे.
Raigad Lok Sabha constituency Sunil Tatkare Vs Darhysheel Patil
Raigad Lok Sabha constituency Sunil Tatkare Vs Darhysheel Patil Saam TV
Published On

Sunil Tatkare Vs Darhysheel Patil

आगामी लोकसभा निवडणुकीची चाहूल राजकीय पक्षाच्या इच्छुकांना लागली आहे. लोकसभेचं तिकीट आपल्याच मिळणार, असा दावा अनेकांकडून केला जात आहे. राज्यात भाजप-शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक तिन्ही पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जागावाटपावरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raigad Lok Sabha constituency Sunil Tatkare Vs Darhysheel Patil
Weather Forecast: महाराष्ट्रासह १३ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; कुठे-कुठे कोसळणार पाऊस? वाचा वेदर रिपोर्ट

कारण, रायगड लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपने दावा सांगितला असून ही जागा आपल्याच मिळावी असा सूर कार्यकर्त्यांनी लावला आहे. रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे असले तरी त्यांना मदत करणारे कुणीच नाही, असंही भाजप कार्यकर्ते म्हणत आहेत. (Latest Marathi News)

अजित पवार गटापेक्षा भाजपची ताकद अधिक असेल तर उमेदवारी का मागू नये, असा सवालही भाजप कार्यकर्ते करीत आहेत. रविवारी (४ फेब्रुवारी) पेण येथे झालेल्या भापज कार्यकर्ता मेळाव्यात ' रायगड का खासदार कैसा हो, धैर्यशिल पाटील जैसा हो " अशा घोषणा व्यासपीठावरून देण्यात आल्या आहेत.

इतकंच नाही, तर खासदार सुनील तटकरे यांचा मतदारसंघात दबदबाच शिल्लक नसल्याचा पाढा देखील भर व्यासपीठावरून वाचून दाखवण्यात आला आहे. त्यामुळे रायगड लोकसभेच्या जागेवरून अजित पवार गट आणि भाजपमध्ये वादाची ठिगणी पडण्याची चिन्ह आहेत. तिकीट नेमकं कुणाला मिळणार याची उत्सुकता अनेकांना आहे.

सध्या रायगडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. मात्र, आता त्यांना मदत करणारे किती आमदार त्यांच्यासोबत आहेत, असा सवाल उपस्थित करत जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी भाजपची ताकद अधिक असेल तर उमेदवारी का मागू नये, असंही पाटील म्हणाले होते.

Raigad Lok Sabha constituency Sunil Tatkare Vs Darhysheel Patil
Yavatmal News: खेळता-खेळता मुलांनी सिमेंटचा पाईप ढकलला; चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दबून मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com