Breaking News: छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा, भाजप-मविआ कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांकडून धरपकड

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरात सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
Chhatrapati Sambhajinagar BJP Vs Maha Vikas Aghadi
Chhatrapati Sambhajinagar BJP Vs Maha Vikas AghadiSaam TV
Published On

Chhatrapati Sambhajinagar BJP Vs Maha Vikas Aghadi

एकीकडे मुंबईतील गोळीबाराच्या घटनांमुळे संपूर्ण राज्य हादरवून गेलं असताना, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरात सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Chhatrapati Sambhajinagar BJP Vs Maha Vikas Aghadi
Manoj jarange Patil: सरकारचा दगाफटका परवडणारा नाही; उद्यापासून पुन्हा आमरण उपोषण...' मनोज जरांगेंचा इशारा

पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. तसेच दोन्ही बाजूंच्या काही आक्रमक कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलं. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होते.  (Latest Marathi News)

दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसळकर यांच्या हत्येवरून राज्यातील कायदा-सुवस्थेवर निदर्शने करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आज सकाळी ११ वाजता क्रांती चौकात जमले होते. याचवेळी मविआच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

यामुळे भाजपचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते अचानक आमने-सामने आल्याने क्रांती चौकामध्ये गोंधळ उडाला होता. भररस्त्यातच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यामुळे वाहतुकही विस्कळीत झाली होती.पोलिसांना दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले.

पोलिसांनी मध्यस्थी करत काही जणांना ताब्यात घेतले. यावेळी मविआच्या कार्यकर्त्यांनी फक्त त्यांचेच कार्यकर्ते ताब्यात घेतल्याचा आरोप केला. राज्यात सर्वसामान्यांसाठी कायद्याचे राज्य राहिले नाही. मुख्यमंत्री यांचा बंगला गुंडांचा अड्डा झाला आहे. गृहमंत्री फडणवीस हे अकार्यक्षम आहेत, अशी टीकाही मविआ कार्यकर्त्यांनी केली.

Chhatrapati Sambhajinagar BJP Vs Maha Vikas Aghadi
Abhishek Ghosalkar: 'मी अभिषेकला सोडणार नाही...'; मॉरिसच्या पत्नीने पोलिसांना काय सांगितलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com