Abhishek Ghosalkar: 'मी अभिषेकला सोडणार नाही...'; मॉरिसच्या पत्नीने पोलिसांना काय सांगितलं?

Abhishek Ghosalkar Firing: घोसाळकार यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी हळदीकुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला जाताना घोसाळकरांना मॉरिसने आपल्या कार्यालयात येण्याचा आग्रह केला.
Morris Bhai Wife Statement
Morris Bhai Wife StatementSaam TV
Published On

Borivali Crime:

बोरिवलीमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण मुंबई हादरून गेली आहे. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर स्वत:वर देखील गोळी झाडून आत्महत्या केली आहे. मॉरिसने असं नेमकं का केलं? याबाबत मोठमोठे खुलासे समोर येतायत. अशात या प्रकरणी मॉरिसच्या बायकोने पोलिसांना महत्वाची महिती दिली आहे.

Morris Bhai Wife Statement
Borivali Crime: आधी बारमध्ये गेले, व्हिडीओ शूट केला मग धाड मारली; मुंबई पोलिसांची धडक कारवाई, 54 महिलांचा सुटका

पोलीस तपासात या प्रकरणी मॉरिसच्या बायकोचाही जबाब नोंदवण्यात आला. बलात्काराच्या गुन्ह्यात मॉरिस जवळपास ५ महिने तुरुंगात होता. अटक होण्यामागे अभिषेक घोसाळकर यांचा हात आहे अशी त्याची समजूत होती. तुरूंगातुन बाहेर आल्यानंतर हा राग त्याच्या मनात धगधगत होता. ‘मी अभिषेकला सोडणार नाही त्याला संपवणारच’ असे मॉरिस बोलल्याचा, असा जबाब मॉरिसच्या बायकोने पोलिसांकडे नोंदवला आहे.

घोसाळकरांच्या हत्येसाठी मॉरिसने वापरलेले पिस्तुल कुणाचं?

मुंबई पोलीस याप्रकरणी सखोल चौकसी करत आहेत. मॉरिस नोरोन्हा याने ज्या पिस्तुलातून या गोळ्या झाडल्या हे पिस्तुल नेमकं कुणाचं होतं, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, मॉरिसने वापरलेलं पिस्तुल सुरक्षा रक्षकाचं असल्याची माहिती समोर येत आहे. मॉरिसने त्याच्याच सुरक्षा रक्षकाचं पिस्तुल घेऊन गोळीबार केला.

घोसाळकार यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी हळदीकुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला जाताना घोसाळकरांना मॉरिसने आपल्या कार्यालयात येण्याचा आग्रह केला. जर घोसाळकरांनी हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय आधी घेतला असता तर त्यांचा जीव वाचला असता, असं म्हटलं जातंय.

Morris Bhai Wife Statement
Buldhana Crime News : गुटखा, कारसह सव्वा सात लाखांचा मुद्देमाल जप्त, बुलढाणा जिल्ह्यात एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com