CCTV Footage: ट्रेनच्या दरवाजात तरुणीला अचानक चक्कर आली, ट्रेनखाली येणार इतक्यात...'; भाईंदरमधील Shocking Video

bhayandar railway station CCTV Footage : काही प्रवाशांकडून या सूचनेकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. असाच प्रकार एक प्रकार समोर आला आहे.
CCTV Footage running train
CCTV Footage running train Saam tv
Published On

महेंद्र वानखेडे, विरार

Local Train Shocking Video :

ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना अनेकदा दुर्देवी अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे रेल्वेकडून ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. ट्रेनमधून प्रवास करताना दरवाजाता उभेही न राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, काही प्रवाशांकडून या सूचनेकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. असाच प्रकार एक प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

भाईंदर रेल्वे स्थानकांतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रिया मधुकर मोरे नावाची तरुणी चर्चेगेट ते विरार असा प्रवास करत होती. प्रवास करताना ती ट्रेनच्या दरवाजात उभी होती. ट्रेनने प्रवास करताना अचानक तिला चक्कर आली. त्यानंतर प्रिया धावत्या लोकल ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर पडली. मात्र, यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या प्रसंगवधाने या तरुणीचा जीव वाचला. या तरुणीला वाचवतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

भाईंदर स्टेशनवर नेमकं काय घडलं?

भाईंदर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र.०१ वर रविवार १२.१२ वाजता चर्चगेट ते विरार लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रिया मधुकर मोरे या तरुणीला प्रवास करत असताना अचानक चक्कर आली. त्यानंतर थेट प्लॅटफॉर्मवर पडली. यावेळी घटनास्थळी हजर असणारे पोलीस कर्मचारी एकनाथ माने आणि चव्हाण यांनी मुलीला वाचविले.

...अन् तरुणी थोडक्यात बचावली

प्लॅटफॉर्मवर पडलेल्या तरुणीला काहीही दुखापत झालेली नाही, थोड्या वेळानंतर तिच्या आई वडिलांना कळविले. तसेच या तरुणीला तिचा मोबाईल व तिची बॅग मिळवून दिली. त्यानंतर विरारला जाणाऱ्या लोकलमध्ये बसविले. त्याबद्दल त्या मुलीच्या आई- वडिलांनी वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाणेमधील पोलीस कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले.

दरम्यान, या तरुणीचा जीव वाचवणाऱ्या पोलिसांचं सर्वत्र कौतुक आहे. तरुणीला अपघातातून बचावल्यानंतर रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांनीही या जिगरबाज पोलिसाचं कौतुक केलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून प्रवाशांना प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com