Viral Video: रील काढणं आलं अगंलट! व्हिडिओ काढताना पुढे झालं असं काही...पाहा धक्कादायक VIDEO

Shocking Video: सोशल मीडियावर दररोज धक्कादायक घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात एका महिलेला स्टंट करण्याच्या नादात जीव गमवावा लागला असता.
Shocking Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

दररोज अनेक नागरिक विविध ठिकाणी पर्यटनासाठी जात असतात. मग नवीन ठिकाणी फोटो जाऊन स्वता:चे फोटोज आपण कॅमेऱ्यात कैद करत असतो शिवाय त्या ठिकाणी असलेल्या अद्भुत गोष्टीचे फोटोज आपल्यापैंकी प्रत्येकजण मोबाईलमध्ये कैद करतो. अनेकदा फोटो नाही तर रील बनवणे यासारख्या अनेक गोष्टी नागरिक करत असतात. मात्र रील बनवताना किंवा फोटो काढताना काही नागरिकांचा निष्काळजीपणा अंगलट येतो. असाच एका गोष्टी संबंधित असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पावसाळ्याचे दिवस सुरु होताच सोशल मीडियावर अनेक अपघाताच्या घटना घडण्यास सुरुवात झाली. धबधब्यावर (waterfall) पाय घसरुन पर्यटकांना जीव गमवावा लागला तर कधी रील काढण्याच्या नादात खोल दरीत पडलेल्या पर्यटकांच्या घटना एकापाठोपाठ समोर आल्या. तरीही अनेक व्यक्ती स्वता:चा जीव धोक्यात घालून रील बनवणे सोडत नाही. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात महिलेला धोकादायक (Dangerous) ठिकाणी रील बनवणे अगंलट आलेले आहे.

काय आहे व्हिडिओत

इन्स्टाग्रामवर व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, व्हिडिओत दिसणारी महिला थेट एका डोंगरासारख्या उंच दिसणाऱ्या ठिकाणी आहे ते ही एकदम टोकाशी. तिथे असणारा एक व्यक्ती तिचा डान्स मोबाईलमध्ये शूट करत आहे. मात्र तितक्यातच महिला ज्या ठिकाणी उभी असते तेथिल मातीचा ढिगारा कोसळतो आणि महिला थेट घसरत खाली जाते. मात्र पाण्यात (Water) पडण्यापासून थोडक्यात बचावली जाते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला असून ''@sk.video_creator_9k's'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होताच नेटकरी वर्गाच चर्चेत आलेला आहे.

व्हिडिओला '५४ हजार सातशे पंच्यानव' पर्यंत लाईक्स (Likes) मिळाले असून लाखोंहून अधिकचे व्ह्यूज अजूनही मिळत आहेत. जर लाईक्स मोठ्या प्रमाणात मिळत असून प्रतिक्रियाही व्हिडिओला आलेल्या आहेत. पहिल्या यूजरने व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट्स बॉक्समध्ये लिहिले की,'पूरा पहाड़ था वहां कूदने क्या जरुरत थी'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'असं केल तर अजून जोरात पडायला पाहिजे होती', अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Viral Video
Viral Video: "बापरे… बाप!"बेडरुममध्ये आढळून आला ९ फूट लांब 'कोब्रा'; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com