Dharashiv News: धबधब्यावर हुल्लडबाजीचा थरार; तरूणांकडून १०० फूट उंचीवर पाणी अडवण्याचा प्रयत्न, धक्कादायक VIDEO पाहा

Youths Rioting At Dharashiv Ramalinga Waterfall: धाराशिवमध्ये तरूणांची धबधब्यावर हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आलाय.
धबधब्यावर हुल्लडबाजीचा थरार
Youths Rioting At Dharashiv Ramalinga WaterfallSaam Tv
Published On

बालाजी सुरवसे, साम टीव्ही धाराशिव

राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे धबधब्यांवर आता पर्यटनासाठी पूरक वातावरण तयार झालंय. धाराशिवमध्ये देखील निसर्ग सौंदर्याने नटलेला रामलिंग धबधबा ओसांडून वाहत आहे. या धबधब्यावर अनेक पर्यटक भेट देत आहेत. यादरम्यान धाराशिवच्या रामलिंग धबधब्यावर जीव धोक्यात घालून तरुणांनी हुल्लडबाजी केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

धबधब्यावर हुल्लडबाजीचा थरार

रामलिंग धबधबा जमिनीपासून १०० फूट उंच(Youths Rioting At Ramalinga Waterfall) आहे. हुल्लडबाज तरूणांनी या धबधब्याचं पाणी अडविण्याचा प्रयत्न करत धिंगाणा घातल्याचं समोर आलंय. जीव धोक्यात घालून तरूणांनी मस्ती केल्याचं पाहायला मिळालं आहे. यामुळे मात्र सामान्य पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता या हुल्लडबाज तरुणांवर प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल निर्माण होत (Dharashiv News) आहे.

धक्कादायक व्हिडिओ

रामलिंग धबधबा परिसरात पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. रामलिंग धबधब्यावर पर्यटकांची मोठी झुंबड दिसते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रामलिंग धबधबा परिसरात सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांनी (Viral News) केलीय. व्हिडिओमध्ये दिसतंय की, आरडाओरडा करत तरूण पाण्याच्या प्रवाहात झोपले आहेत. पायांनी ते धबधब्याचे पाणी अडविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा खेळ जीवावर बेतु शकतो, असं चित्र आहे. परंतु तरूणांना या स्थितीचं कोणतंही गांभीर्य नसल्याचं दिसतंय. आपल्याच धुंदीत बेफिकीरपणे तरूण मस्ती करत आहे.

धबधब्यावर हुल्लडबाजीचा थरार
Chinchoti Waterfall: वसईच्या घनदाट जंगलात वाहतोय पांढराशुभ्र धबधबा; एकदा भेट द्याच

तरूणांची धबधब्यावर हुल्लडबाजी

रामलिंग धबधबा बालाघाट पर्वतरांगांमधील येडशी अभयारण्यामध्ये (Ramalinga Waterfall Video) आहे. हे पर्यटनस्थळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर आहे. दरवर्षी येथे हजारो पर्यटक भेट देतात. पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवेगार डोंगर अन् मंद वाऱ्याची झुळुक पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करते. डोंगरदरीत वसलेला हा धबधबा निसर्गप्रेमींचं खास आकर्षण आहे. परंतु सध्या तेथील वातावरण काही हुल्लडबाज तरूण खराब करताना दिसत आहेत, आता या पार्श्वभूमीवर या तरूणांवर काही कारवाई होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

धबधब्यावर हुल्लडबाजीचा थरार
Bendewadi Waterfall : निसर्गाचं सौंदर्य पाहून डोळे दिपतील; मावळमधील कुणीही न पाहिलेला हिडन धबधबा, एकदा भेट तर द्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com