आजच्या काळात व्हॉट्स अॅप हे एक महत्त्वाचे अॅप बनलं आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या फोनवर व्हॉट्स अॅप इन्स्टॉल केलेलं असतं. या अॅपमुळे लोकांमधील अंतर कमी झालं असून कितीही किलोमीटर दूर असलेला व्यक्ती आता आपल्याला दिसू शकतो. त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतो.(Latest News)
व्हॉट्स अॅप हे सुरुवातीला फक्त मेसेजिंग अॅप (messaging app) होतं पण यात हळूहळू अनेक नवीन फीचर्स जोडले गेलेत. या नवनवीन फीचर्समुळे व्हॉट्स अॅपचा उपयोग वाढलाय. आता या अॅपमध्ये कॉलिंग फीचरही जोडण्यात आलंय, ज्यामुळे तुम्ही व्हॉट्स अॅपचा कॉल रेकॉर्ड करू शकतात. व्हॉट्स अॅप कॉल रेकॉर्ड करणे सोपे आहे हे अनेकांना माहीत नसेल. WhatsApp मध्ये कॉल रेकॉर्ड करण्याचा कोणताही अधिकृत मार्ग नाही. परंतु तुम्ही थर्ड-पार्टी अॅप्स वापरून WhatsApp कॉल रेकॉर्ड करू शकता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्याचा हा एक सोपा मार्ग
तुमच्या फोनवर थर्ड-पार्टी कॉल रेकॉर्डिंग अॅप डाउनलोड करा.
अॅप उघडा आणि सेटिंग्ज वर जा.
कॉल रेकॉर्डिंग सक्षम करा म्हणजेच इनेबल करा.
व्हॉट्स अॅप कॉल करा किंवा कॉल येऊ द्या.
एकदा कॉल सुरू झाल्यानंतर अॅप आपोआप कॉल रेकॉर्ड सुरू करेल.
काही लोकप्रिय कॉल रेकॉर्डिंग अॅप्स
Cube ACR
Call Recorder
Automatic Call Recorder
नव्या वर्षात व्हॉट्स अॅपचे नवे फीचर्स
व्हॉट्स अॅपचं यावर्षी युजरनेमचं फीचर येणार आहे. या फीचर्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या हँडलला आवडीचं नाव देऊ शकता. व्हॉट्स अॅपचं हे फिचर 'एक्स' (जुन नाव ट्विटर) सारखं असू शकतं. तुम्ही व्हिडिओ कॉलदरम्यान म्यूझिक ऑडिओ देखील शेअर करू शकता. त्यात स्क्रिन शेअरींगचं नवं फिचर देखील असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.