Manasvi Choudhary
उन्हाळा सुरू झाला की त्वचेची काळजी घ्यावी लागते. कडक उन्हापासून त्वचेचे संरक्षण होण्यासाठी खास काळजी घ्यावी लागते.
उन्हाळ्यात शरीरातून घाम येतो यामुळे त्वचेवर पिंपल्स, मुरूमे होण्याच्या समस्या अधिक वाढतात. मात्र या त्रासातून सुटण्यासाठी तुम्ही काही घरगुती सोप्या टिप्सचा वापर करू शकता.
कडुलिंबामध्ये 'अँटी-बॅक्टेरियल' गुणधर्म असतात, जे पिंपल्स पसरण्यापासून रोखतात. कडुलिंबाची पाने वाटून त्यात चिमूटभर हळद मिसळा आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावा.
काकडी किसून तिचा रस काढा आणि त्यात ताजे कोरफड जेल मिक्स करून ही पेस्ट चेहऱ्याला लावा.
चंदन हे नैसर्गिकरित्या थंड असते आणि ते पिंपल्सचे डाग फिके करण्यास मदत करते. चंदन आणि कच्चे दुध मिक्स करून चेहऱ्याला लावा.