Manasvi Choudhary
कुंभमेळ्यात माळ विकणारी व्हायरल गर्ल मोनालिसा सर्वांनाच माहिती आहे. मोनालिसाच्या सौंदर्याने कुंभमेळ्यात येणाऱ्या प्रत्येकालाच वेड लावलं आहे.
यानंतर मोनालिसाला तुफान प्रसिद्धी मिळाली. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
अशातच मोनालिसा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते म्हणजे मोनालिसाने पळून जाऊन लग्न केलं आहे.
मोनालिसाने तिचा बॉयफ्रेड फरमान खानसोबत लग्न केलं असल्याची माहिती आहे. कोण आहे फरमान खान याविषयी या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
सोशल मीडियावर मोनालिसा आणि फरमानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहे. केरळमध्ये मोनालिसाने फरमानसोबत लग्न केलं आहे.
मोनालिसाने आंतरधर्मीय विवाह केला आहे. फरमान मुस्लिम असल्याने लग्नासाठी तिच्या कुटुंबाचा विरोध होता यामुळे मोनालिसाने पळून लग्न केलं आहे.
मोनालिसाचा नवरा फरमान खान हा अभिनेता आहे. तो देखील मॉडेलिंग करतो. मुळचा महाराष्ट्राचा फरमान मोनालिसाला सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटला आहे. या दोघांची मैत्री फेसबूकवर झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
मात्र मोनालिसाच्या घरच्यांनी विरोध केल्याने त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला .